नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात बारावी नंतर पुढे काय? या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर

63

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

तुमसर(दि.7मे):-स्थानिक न. प. नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर अंतर्गत मराठी विभागाद्वारे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे तसेच बारावीनंतर पुढे काय? या विषयावर आयोजन करण्यात आलेले होते! महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भारत थोटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रा. संजय लेनगुरे श्री. रमेश बोंद्रे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग पार पडले.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री. रवींद्र कावळे सर चंद्रपुर यांनी स्पर्धा परीक्षा विषयक चालू घडामोडी तसेच बारावी नंतर पुढे काय? इत्यादी विषयावर विविध उदाहरणे, दाखले देऊन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. संजय लेनगुरे यांनी या कोरोना काळात विद्यार्थ्यांची मनस्थिती ही द्विधा अवस्थेत असून त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करून बोर्डाच्या परीक्षेला सामोरे कसे जाता येईल याबद्दल प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यामागचा हेतू आहे असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते! कार्यक्रमाचे संचालन कु. दामिनी वाघमारे यांनी तर आभार कुनाल बांडेबुचे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शुभांगी पटले ,लक्ष्मी पटले, शुभांगी कीरपाने ,निकिता नागफासे, शर्वरी गाळवे, प्राची पटले, महक बनसोड ,मंथन बडवाईक, इशांत लांजेवार, गुलशन गोपाले, सुरज कडू ,प्रवीण बोरकर, यांनी परिश्रम घेतले.