कुटकी ते लहान आर्वी मार्गावर पोलिसांनी दारुसह ३ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

24

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)

वडनेर(दि.7मे):- पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कुटकी ते लहान आर्वी मार्गावर नाकाबंदी केली असता काही वेळातच या मार्गाने भरधाव वेगाने जात असलेल्या सिलवर रंगाची काराला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र कार मध्ये दारू साठा असल्याने कार चालकाने पोलिसांना पाहता कार क्रमांक एम एच ०६ ए.एफ २८९८ सोडून शेतशिवाराच्या मार्गाने पळ काढला.

यावेळी पोलिसांनी कारची पाहणी केली असता या कार मध्ये १ लाख ८०० रुपये किंमतीचा देशी विदेशी दारुची साठा आढळून आला यावेळी पोलिसांनी कार सह ३ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला हि कारवाई वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे व पोलिस उपनिरीक्षक मसराम यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अजय वानखेडे मनोज धात्रक राहुल गिरडे,प्रफुल चंदनखेडे, अतुल लभाने, आदींनी केले आहे.