लॉकडाऊन असले म्हणून काय झाले,श्वास कधी थाबतो

36

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.8मे):-इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल या उक्ती प्रमाणे आपल्या अंगीकृत गुणांना वाव देत व कोणताही कलेचा अभ्यास नसताना फक्त इच्छाशक्तीच्या बळावर तब्बल चौदा फूट लांब व अकरा फूट उंच अशी ऑईल पेंट मध्ये भीत्ती चित्र साकारले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,ता.माणगाव जि. रायगड.येथील द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल ची विद्यार्थिनी *सायली राजे* यांनी साकारली आहे. अनेकजण लॉकडाऊन च्या माध्यमातून पळ वाट शोधत असताना लॉक डाऊन ही एक संधी आहे आणि त्याचा फायदा घेत कलाकृती साकारली. लॉक डाउन असले म्हणून काय झाले. कारणे तर विना कारण असतात.यशाला प्रयत्नच पाहिजेत. अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

शिक्षण, मग ते शालेय असो वा शाळाबाह्य ते शिक्षण असते ,परंतु आपल्या अंतर्मुखात द डलेल्या कलाकाराला ओळखून त्याला वाव देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलाच पाहिजे असे ही म्हणतात, घराला कला दालनात रूपांतर करण्याचं स्वप्न असून रंग कामातील वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे अस ही त्यांनी सांगितले. वास्तविक इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आणि पेंटिंगचा कुठेही संबंध येत नसला तरी पेंटिंग ही माझा छंद असल्याने जोपासला जाणार असल्याचे सांगितले.