कोठली येथे महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती उत्साहात साजरा

49

✒️शहादा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शहादा(दि.9मे):-कोठली ता.शहादा येथे महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती व फलक सुशोभिकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंबरसिंग गिरासे हे होते तर उदघाटक म्हणून प्रकाश फकिरा पाटील हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ठाणसिंग गिरासे, युवानेते राहुल पाटील,प्रदीपसिंग गिरासे,युवकमित्रचे प्रवीण महाजन,बादलसिंग गिरासे, राजेंद्र गिरासे,प्रविनसिंग गिरासे,आसाराम माळी, ह.भ.प.किर्तीमान गिरासे, पदमसिंग गिरासे, सरदारसिंग गिरासे यांच्यासह युवक व समाज बांधव उपस्थित होते.

कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी गावात महाराणा प्रतापसिंहजी यांचे भव्य स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.ह.भ.प.किर्तीमान गिरासे व आसाराम माळी यांनी यावेळी गावातील व्यसनधिनता व बेरोजगारी याविषयावर मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले तर बादलसिंग गिरासे यांनी आभार मानले.