रुग्णांना तपासाअंतीच एडमिट करा नसता कोरोना वाढीचे आपणच जबाबदार!

30

🔹तलवाडा ग्रामपंचायत कडुन खाजगी डाॅक्टरांना सूचना

” बीड जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी साहेबांनी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंटीजन टेस्ट कीटचा पुरवठा करन्याची मागणी तलवाडा ग्रामपंचायत कडुन करण्यात येत आहे.”

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

तलवाड(दि.10मे):- देशाच्या राजधानी दिल्ली सह देशात व राज्यभरात कोविड 19 मुळे कोरोना सारख्या महामारीने उग्र रुप धारण केलेले आसतांना गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत कडुन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतल्या जात असुन तलवाडा गाव व परिसरात रिक्शा लाऊन भ्रमध्वनीद्वारे नागरिकांना कोरोना संदर्भात खबरदारीच्या सूचना वेळो वेळी दिल्या जात असुन तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तपासल्या नंतरच खाजगी डाॅक्टरांनी पुढील ऊपचार करावे आस्या सूचना तलवाड्यातील सर्व खाजगी डाॅक्टरांना या पुर्वीच भ्रमध्वनीद्वारे देण्यात आलेल्या आसतांना देखील खाजगी दवाखाने खचाखच भरलेले दिसुन येत आसल्याने तलवाडा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व खाजगी डाॅक्टरांना सूचना वजा एक एक निवेदन देण्यात आले.

असुन या निवेदनात म्हण्टले आहे रुग्णांना प्रथम तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासल्यावरच आपल्या कडे एडमिट करुन घ्यावे जेणे करुन या आर्थिक संकटाच्या काळात रुग्णांनच्या कुटुंबीयास त्रास होणार नाही. गाव व परिसरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होणार नाही याची सर्वस्व जबाबदारी डाॅक्टरांची राहील त्या मुळे हे कमाईचे दिवस न समजता जनहित व देश हिताचा डाॅक्टरांनी विचार करुन दक्षता घ्यावी रुग्ण एडमिट करुन घेत आसतांना त्याचा सरकारी दवाखान्यातील रिपोर्ट निगेटिव किंवा पाॅझीटिव आहे ह्या पाहणी नंतरच निर्णय घ्यावा आपण आधी एडमिट करुन घेता व नंतर ईतर ठिकाणी पाठवत आसल्याचे दिसुन येत आहे ह्या मुळे या परिसरात रुग्ण संख्यात वाढ होतांना दिसुन येत आहे म्हणुन आपण भान ठेऊन शासन व प्रशासनास सहकार्य करुन माणुसकी जपावी आसे निवेदन तलवाडा ग्रामपंचायतने सर्व खाजगी डाॅक्टरांना दिले आहे.