डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेला चळवळीतील तारा निखळला

34

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.11मे):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेला आणि त्यांच्या विचारधारेने संपूर्ण आयुष्य फुले, शाहू आंबेडकरी चळवळीला आपले योगदान देणाऱ्या श्रीमती चतुराबाई सुभाना शिंदे यांचे आज पहाटे 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्या 95 वर्षाच्या होत्या त्याच्या पश्चात 2 मुले 2 मुली 3 सुना आणि नातवंडेन असा परिवार आहे.चतुराबाई याचे माहेर म्हसवड,ता.माण,जी.सातारा अंत्यत गरीब कुटूंबातील जन्म परंतु लहान पणापासूनच फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होत्या कुटूंबाची परिस्थिती हालाखीची असून सुद्धा त्यांनी कधी हार मानली नाही.

सुभाना शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या मूंबई येथे वास्तव्यास गेल्या तेथे गोदीत काम करून आपला आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या त्याचवेळी त्यांचा संबंध आंबेडकरी चळवळीतील लोकांशी आला आणि त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या.फुले ,शाहू आणि आंबेडकरांचे विचाराशी खूणगाठ बांधली त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित बनवले मोठा मुलगा क्लास वन अधिकारी त्यानंतरचा मुलगा पोलीस अधिकारी तर लहान मुलगा इन्कम टॅक्स खात्यामध्ये अधिकारी बनविला.

त्यांनी नेहमी चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांचा सबंध बाबासाहेबांशी आला आणि चळवळ व्यापक करून बहुजनांना चळवळीशी जोडले आपल्या खर्ड्या आवाजात भाषण करताना नेहमी लोकांना बाबासाहेबांचे विचार पटवून सांगण्याचा प्रयत्न त्या करत असत.त्यांच्यावरील संस्काराने त्याच्या मोठ्या मुलांनी बहुजन चळवळीसाठी अनेक पुस्तके लिहिली होती. त्याच्या कुटूंबातील वातावरण सुद्धा फुले, शाहू आंबेडकर चळवळीला पूरक असेच त्यांनी ठेवले होते.

बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत बाबासाहेबांचे चरण स्पर्श केल्याचे समाधान त्या नेहमी सांगत होत्या.त्यांच्या जाण्याने चळवळ पोरकी झाली.त्यांच्या जन्म गावी म्हसवड,सासर गोदवले आणि मुबई तील(विक्रोळी) राहत्या ठिकाणी त्यांना श्रद्धाजली वाहण्यात आली.
त्याच्या जाण्याने सर्व परिसरात हळहळ व्यक्त करणेत येत आहे.