✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.11मे):- करोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असुन राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीत आज १० मे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस म्हणजेच बहुजनांचा दिवस या स्वाभिमानी दिनानिमित्त परळी येथे पँथर आर्मीच्या पँथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन भैया इंगळे, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजेभाऊ सरवदे, महासचिव आशिष भैया मुंडे, कार्याध्यक्ष महेशभाऊ कचरे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन बीड जिल्हा सरचटणीस गौतम भाऊ साळवे, परळी शहराध्यक्ष संजूभाऊ गवळी यांच्या मार्गदर्शनाने आज परळी येथे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
पँथर आर्मीचे बीड जिल्हा युवाध्यक्ष प्रमोदभाऊ रोडे, परळी तालुकाध्यक्ष अतुलभाऊ रोडे, महासचिव विष्णू घाडगे आणि समाधान रणखांबे आज खिचडी व पाणी वाटपाचा हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी शासनाने केलेल्या सर्व कोरोणा निर्बंधाचे पालन करण्यात आले. तसेच यापुढेही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस परळी तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रमध्ये असेच उपक्रम राबविण्यात येतील.