पोलिसांनी पकडले चार ट्रक स्वस्थ धान्य

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

राजूर(दि.12मे):- तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्थ धान्य पकडले असून संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत तसेच या ट्रकचे क्रमांक एम एच १७ ऐवजी मुंबई पासिंग असल्याने राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सहायक फौजदार नितीन खैरनार हेड कॉन्स्टेबल भडकमवार यांनी चार ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तपशील दिला आहे.

याबाबत समजते कि , राजूर येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एम. एच ०४ ई . वाय . ५२९१ चालक हौशीराम देशमुख २१८ बॅग ५० किलोप्रमाणे धान्य ,एम एच १५ एफ . व्ही .९०५७ चालक साई धुमाळ १४९ बॅग ५० किलोप्रमाणे ,एम एच १७ ए . जी . ३८८३ चालक योगेश धुमाळ २०६ बॅग ५० किलोप्रमाणे , एम एच १७ टि २९०० चालक अशोक देशमुख २०३ बॅग ५० किलोप्रमाणे धान्य असलेल्या चार ट्रक संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत याबाबत तहसील पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता गाडे ट्रान्स्पोट कंपनीच्या ट्रक मधून दुसऱ्या टप्प्याचे हे धान्य पोहचविण्यासाठी एम एच १७ बीवाय ७२४३ १५ मेट्रिक टन , एम एच १७ टी २५९३१२ मे . टन , एम एच १४ बिजी २३२५ २० मे , टन एम एच १४ ए एच ६९५९ २० मे . टन या व इतर दोन ट्रकला अन्नधान्य वाहतुकीसाठी परवानगी देण्यात यावी असे पत्र दिले होते त्याप्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही केली होती मग या ट्रक मधून का धान्य नेण्यात आले.

त्यात परमिट वर गोडावून किपर यांची सही नसल्याने मोठा संशय व्यक्त होत आहे . सध्या कोरोना मुळे आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी या ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे . याबाबत तहसीलदार यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश व्हावेत असे कळविले आहे . तालुक्यात स्वस्थ धान्य पूर्णतः करणाऱ्या वाहनांवर हिरवा पट्टा असावा , वितरण व्यवस्था असा बोर्ड असावा असे असतानाही हे नियम न पाळता मुंबई पासिंग च्या ट्रक का निवडल्या याबाबत तर संबंधित अधिकृत पुरवठा धारक कोण ? याची चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी केली आहे . तर माजी आमदार वैभव पिचड यांनीही याबाबत चौकशी होऊन गरीबाच्या ताटातील अन्न इतरत्र जात असेल तर चौकशी होणे आवश्यक आहे.

राजूर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तसेच सरपंच गणपत देशमुख , संतोष बनसोडे ,पांडुरंग खाडे , सुरेश भांगरे , आकाश देशमुख आदींनी चौकशीची मागणी केली आहे . वैभव पिचड (माजी आमदार ) जिल्हा पुरवठा विभागाने या अनागोंदी कारभारास आळा घालावा आज आदिवासी भागात खाण्यासाठी अन्न मिळत नाही खावटी नाही रोजगार नाही त्यात जर असे धान्य कोणतेही सरकारी निरबंध न पाळता अन्नधान्य नेले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही राजूर पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे तर महसूल विभागाने कोणतेही राजकीय दडपण झुगारून न्याय निवड करावा नाही तर कुंपणाने च शेत खाल्ले असे म्हणावे लागेल . योग्य पद्धतीने तपस करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे .