परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी ?

49

जगातील सर्व नर्सेसना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आज म्हणजे १२ मे ला हा लेख प्रसिद्ध झाला पाहिजे होता.त्यादुष्टीने मी तो लिहत होते.नर्स ची दिवटी म्हणजे फिक्स नसते.गरज पडली तेव्हा हजर राहावे लागते.सोबतच्या सहकार्यावर रुग्ण सेवेचा त्राण वाढत आहे हे माहित असल्यावर ही मला शांत झोप लागणे शक्य नाही. ही एक सामाजिक जबाबदारी म्हणूनच नोकरी स्वीकारली ती बांधिलकी पूर्ण केलीच पाहिजे.त्यामुळे परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?. हा लेख १० किंवा ११ तारखेला इमेल केला पाहिजे होता.ते शक्य झाले नाही म्हणून आज १२ मे ला पाठवीत आहे.कृपया समजून घ्यावे.

इंटरनॅशनल नर्सेस डे हा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणून आपण जागतिक परिचारिका दिन साजरा करतो,तर या फ्लॉरेन्स नाइटिंगेल ए होत्या तरी कोण?. फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्म १२ मे १८२० – मृत्यू १३ ऑगस्ट १९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धा दरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांना “लेडी विथ द लॅम्प” (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली.

त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्यादिन” म्हणून साजरा केला जातो. आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्या कडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल ए रोट फर्स्ट नर्सिंग नोट दॅट बीकम द बेसिस ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस अँड रिसर्च. दि नोट्स इनटायटल नोट्स ऑफ नर्सिंग, “व्हॉट इट इस व्हॉट इज नॉट” (१८६०). लिस्टेड सन ऑफ हर थेरीस सर्वड. ऍझ फाऊंडेशन ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस इन व्हेरियस सेटिंग्स इंनक्लुडिग द सकसीडींग कन्सप्च्युअल फ्रेमवर्क अंड थेरीज इन फिल्ड ऑफ नर्सिंग .फ्लॉरेन्स नाइटिंगेल ए इस कन्सिडर फर्स्ट नर्सिंग थेरीईस्ट वन ऑफ हर थेरी एन्व्हायर मेंटल थेरी विच इंनकार्पोरेट ऍड रिस्टोरेशन ऑफ दय युजवल हेल्थ स्टेटस ऑफ द नर्सेस क्लाइंटस इन टू डिलिव्हरी ऑफ हेल्थ केअर इट इज स्टील प्रॅक्टिस टुडे…थोडक्यात काय तर ही 1860 मध्ये रिलीज झालेली एन्व्हायरमेंटल थेरी किती इम्पॉर्टंट होती याचं महत्त्व दीडशे वर्षापूर्वी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ए यांनी जगाला सांगून दिले होते. आणि आज दीडशे वर्षानंतर ही या कोरोनाव्हायरस आणि covid-19 नी जगाला समजावून सांगितलेले आहे, धडा घालून दिलेला आहे की एन्व्हायरमेंटल थेरी आपल्या पूर्ण जगासाठी किती महत्त्वाची आहे..

कारण एन्व्हायरमेंट हेल्थ मॅटर्स फोर अल्टिमेट हेल्थ ऑफ दि हुमन बीइंग. एन्व्हायरमेंटल थेरी मध्ये जरी, प्युअर फ्रेश इयर, प्युअर फ्रेश वॉटर, इफेक्टिव ड्रेनेज, क्लिनलीनेस अँड लाईट या गोष्टींचा जरी समावेश असला तरी या गोष्टी आणि त्यांची कमतरता हेल्थ वर कशी परिणामकारक असते हे त्यांच्या थेरीमधून सरळ सरळ मांडले आहे आणि आज दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये पूर्ण जग या गोष्टीची प्रचिती घेत आहे. साबण पाण्याने हात स्वच्छ आणि वारंवार धुणे,अल्कोहल बेस्ड सॅनिटायझर वापरणे, आणि मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग वापरणे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आजच्या घडीला पूर्ण जगाला करावा लागत आहेत. तर हे होतं थोडक्यात फ्लोरेंस नाइटिंगेल ए यांच्याबद्दल आणि यांचा जन्मदिवस आपण जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो.

गेल्यावर्षी 2020 मध्ये डब्ल्यू एच ओ 2020 हे साल येअर ऑफ नर्स अंड नर्स मिड वाइफ म्हणून घोषित केले होते. आणि गेल्या वर्षीची थीम होती “नर्सिंग द वर्ल्ड हेल्थ” आणि खरच अख्या जगाने याची प्रचिती घेतली होती सन 2020 सरते न सरते तोच सन 2021 मध्ये पुन्हा एकदा कोरोनानी दहशत माजवली आहे. दुसरी वेव आणि डबल म्यूटंट आणि ट्रिपल म्यूटंटच्या स्वरूपात. कोरोनाचा हाहाकार भारतामध्ये फेब्रुवारीपासून ते आजतागायत चालू आहे. आणि आता बारा मे 2021 जागतिक परिचारिका दिनाचे थीम आहे. “नर्सेस व्हाईस टू लीड: विजन फोर फ्युचर हेल्थकेअर” म्हणजेच भविष्यात नर्सिंग केअर हे कसं काम करेल आणि नर्सिंग प्रोफेशनचा ट्रान्सफॉर्मेशन हे कसं नेक्स्ट लेवल वरती असेल आणि नर्सिंग प्रोफेशन च अपग्रेडेशन हे येणाऱ्या दिवसात दिसून येईलच रिगार्डिंग हेल्थकेअर ऑफ दि इंडिव्हिज्युअल, सोसायटी अंड अल्टिमेटलि कंट्री. तर हे झालं थोडक्यात द फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग आणि नर्सिंग थीम ऑफ इयर 2020 अंड 2021.परिचारिका शब्दा मध्ये परी हा शब्द आधी उच्चारला जातो.

पण या खरच परी आहेत का?. कोणी परी बोलतो कोणी एंजल्स बोलतो.पण एंजल्स आणि परी या तर कथेत असतात ना, किंवा स्वर्गात! मग या काल्पनिक शब्दाला नर्सिंग प्रोफेशनशी जोडून त्यांना परी हे टायटल देणे पुरेसं आहे का. म्हणजे ज्या नर्सेस दिवस-रात्र एक करून परिश्रम करताय, रुग्णालयामध्ये निगेटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये रात्रीचा दिवस करून काम करताय, 24 तास त्या मनुष्य बळाला तुम्ही फक्त एंजल्स किंवा परी म्हणून चालेल का? परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?. नर्सिंग प्रोफेशन मध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला ज्यांचे हात पाय डोळे डोके कान हृदय डोकं न थकता वर्षानुवर्ष कार्यरत आहे आणि जे जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्या महिलांना किंवा त्या नर्स ला आपण फक्त परी म्हणून नाही चालणार! युद्ध असो किंवा नसो दिवस-रात्र राबते ती परिचारिका !. युद्ध जरी नसेल तरीही अहोरात्र काम करणाऱ्या आजच्या काळातल्या त्या खऱ्या रणरागिनी आहेत. महिला म्हंटले की त्यांच्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. महिला म्हणजे दीन दुबळ्या कोणाचातरी सहारा लागणाऱ्या असा वर्ग समजला जातो पण या नर्सिंग प्रोफेशन मध्ये 99 टक्के महिला परिचारिका कार्यरत आहेत आणि त्या थोडे थोडके नाही तर दुसऱ्या महायुद्धापासून कार्यरत आहेत. जमिनीवर कार्य करणाऱ्या महिलांना आपण एंजल्स म्हणणे किंवा परी म्हणून संबोधने जरी अभिमानाची गोष्ट असली तरी पण थोडीशी काल्पनिकच वाटते.

अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन बाईडन सर यांनी परिचारिका बद्दल खूप सुंदर ट्विटर वरून सांगितले की “आय ह्याव ओफन सेड इफ देअर आर एंजल्स इन हेवन दे आर नर्सेस दे. ह्याव गिवेन सो मच अंड सेवड सो मेनी लाईफ आऊट द कोर्स ऑफ दिस पंडेमिक.” असं म्हणत त्यांनी नर्सेस प्रति आभार व्यक्त करत ते सदैव नर्सेसच्या पाठीशी राहतील असं वक्तव्य त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून केलं.खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे की युएस प्रेसिडेंट नर्सिंग प्रोफेशन बद्दल इतक्या उच्च पद्धतीने त्यांचे विचार व्यक्त करतात आणि या रणरागिणींनीची तुलना स्वर्गातल्या एंजलसि करून या पंडेमिक मध्ये कसे अनेक जीव वाचवत आहेत हे अख्ख्या जगाला सांगतात… परिचारिका दिनानिमित्त नर्सेस विक सेलिब्रेशन दरवर्षी होते पण कोरोनाचे सावट असल्यामुळे आणि सर्व नर्सेस रुग्ण सेवेमध्ये दंग असल्यामुळे आपण गेल्यावर्षीही नर्सेस डे सेलिब्रेशन केले नव्हते आणि या वर्षीही कोरोनाचे सावट असल्यामुळे नर्सेस सेलिब्रेशन हे फक्त वर्चुअल पद्धतीनेच होईल.

भारतीय नर्सेस यांची गुणवत्ता जागतिक किंवा भारताबाहेरच्या नर्सेसच्या गुणवत्ते बरोबर तुलना केली तर भारतीय वर्सेस ला जागतिक. भारतीय नर्सेस या जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये कार्यरत आहेत आणि त्याचे कारण म्हणजे आत्मसन्मान जीवनशैली आणि ऑफ कोर्स वेजेस. पण याच गोष्टी भारतामध्येही संभव आहेत भारतीय नर्सेसना हायली एज्युकॅटेड करून त्यांच्या स्किल्स मध्ये आणखी सुधारणा घडवून त्यांना ही एक जागतिक नर्सेसच्या प्रमाणे दर्जा प्राप्त करून देऊ शकतो त्यासाठी नर्सिंग प्रोफेशन मधल्या सीनियर नर्सेस आणि हायली एज्युकॅटेड नर्सेस ‌नी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यामुळे भारतीय नर्सेसचे मायग्रेशन हे काही प्रमाणात कमी होईल आणि भारतीय नर्सेस या भारतातच काम करतील.

आजच्या महामारी मध्ये भारतामध्ये कितेक नर्सेस या पंडेमिक मध्ये गेल्या दीड वर्षापासून सतत कोविड रुग्णांची सेवा करत आहेत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून इक्वली आणि स्वतंत्ररित्या त्यांच्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वताला संसर्ग होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या नर्सेसची संख्या (3000) ही संख्या जगातल्या 60 देशातील नर्सेसची संख्या आहे, संसर्ग होऊन पुन्हा कामावर रुजू होणार्‍या ही संख्या ही प्रचंड आहे, संसर्ग न होता आज पर्यंत अविरत काम करणाऱ्या नर्सेसची संख्या मात्र बोटावर मोजण्याएवढीच असू शकेल.म्हणजेच काय तर संसर्गाची सर्वात जास्त भीती असताना पण रुग्णसेवेसाठी तत्पर, खंबीर आणि प्रामाणिकपणे उभा राहून निष्ठेने आपलं काम करणे आणि संसर्ग होईपर्यंत ते काम करत राहणे ही एकच भूमिका ठाम पणे माझ्या नर्सेस भगिनींनी ह्या दीड वर्षांमध्ये जगासमोर भारतासमोर मांडली आहे.ज्या भगिनींना संसर्ग झाला त्यांच्या कुटुंबियांना पण त्यांच्यामुळे संसर्ग होऊन अनेक जनांनी परिवारातील कोणी ना कोणीतरी गमावलं आहे.पण तरीही कामावरती रुजू होऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे.

नीती आयोग आणि बीएमसी मॉडेलची स्तुती केली किंवा हायकोर्टाने मुंबई मॉडेल बेस्ट आहे हेच सांगून दिलं आणि ते कसं फॉलो करावा हे भारतातला सांगितले. त्या मुंबईच्या बीएमसी मध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक परिचारिकेला आणि तिच्या कामाला कामाला आवर्जून सलाम.या पंडेमिक मध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे 2020 ला ज्यावेळी नर्सेस चा तुटवडा निर्माण होत होता त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नर्सेस या पंडेमिक मध्ये कामावरती रुजू झाल्या आहेत. हातात दहा रुपये नसतानाही त्यांनी कामावर ती रुजू होण्याची हिंमत दाखवली आहे आणि त्यांनी करूनही दाखवलं आहे आजही ते न थकता कोविडमध्ये अविरतपणे कार्य करत आहेत. कोविड मध्ये काम करत असताना त्यांचे राहण्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांच्या खाण्याचे प्रॉब्लेम्स होत असताना आणि कडक लॉक डाऊन मध्ये ट्रान्सपोर्ट चे प्रॉब्लेम्स होत असताना देखील नर्सेस आजही तेवढ्याच निष्ठेने काम करत आहेत सर्व गोष्टींवर ती मात करत त्यांनी जागतिक महामारी मध्ये आपली तत्परता आणि प्रोफेशनच्या परी एक निष्ठा दर्शविली आहे तसेच जेव्हा जेव्हा रुग्ण सेवा करताना परिचारिकांची संख्या कमी भासत होती तेव्हा तेव्हा स्टुडन्ट नर्सेस ने पण शॉर्ट नोटिस वरती कामावर ती रुजू होऊन काम केलं आहेत. खरंच सलाम त्या मातेला ज्या मातेने आपल्या मुलींना या प्रोफेशन मध्ये पाठवलं आहे आज पण निर्भयपणे संसर्गाची भीती न बाळगता आजही कार्यरत आहेत.

नर्सिंग प्रोफेशनल म्हंटलं की सायंटिफिक नॉलेज आणि स्कील सोबतच इथिकलरल सारखे पण मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. नर्स ही फक्त इंजेक्शन गोळ्या देत नसून ती कम्प्रेहेंसिवे नर्सिंग केअर देत असते..कम्प्रेहेंसिवे नर्सिंग केअर म्हणजे फक्त गोळ्या आणि इंजेक्शन न देता रुग्णाची फिजिकल मेंटल सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ जपणे. केअर करताना रुग्णाची इकॉनोमिकल कंडीशनची जाणीव असणे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे तर अशाप्रकारे आपल्या नर्सेस या रुग्णांशी हेल्थ आणि रुग्णांच्या नातेवाइकांचे मनोबल जपण्याचा प्रयत्न हा करत असतात आणि करत राहतील.एक परिचारिका म्हणून अंकाच्या अंती मला एकच सांगावसं वाटेल तुम्ही त्यांना एंजल्स म्हणा परिचारिका म्हणा म्हणा किंवा ताई म्हणा तुमच्या कुटुंबातील कोणी ना कोणीतरी रुग्णालयात ऍडमिट झाल्यानंतर या परिचारिकांचा आपल्याला अनुभव किंवा या रुग्णालयातील त्यांच्या कामाची प्रचिती येत असते.या जगाने खूप सारे युद्ध बघितले असतील महायुद्ध बघितले असतील प्रत्येक युद्धामध्ये योद्धा हा पुरुष असतो आणि पुरुष नवृत्तीने लढत असतो पण दुसर्या महायुद्धात या परिचारिकांनी बाजी मारली होती आणि आता या जागतिक महामारीत सुद्धा परिचारिका या काम करत आहेत मग तुम्ही त्यांना एंजल्स म्हणा परिचारिका म्हणा इट रियली डझन्ट मॅटर. त्या त्यांचं काम करत होत्या करत आहेत आणि करत राहतील पण एक लेखिका म्हणून माझ्यासाठी तरी त्या युद्धा मधल्या रणरागिनी पेक्षा कमी नाहीत.थकले माझे पाय ,थकले माझे हात ,थकलेलं माझं शरीर तरी हृदय माझं थकणार नाही घेतला वसा मी परिचारिकेचा तो कधीच सोडणार नाही..

नर्सेस या आरोग्य यंत्रणेचा केंद्रबिंदू असतात आरोग्य यंत्रणेचा कणा असतात आणि रुग्णालयाचा हृदय असतात* जर हा कणा कोलमडला नाही आणि हे हृदय जर चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील तर ही आरोग्य यंत्रणा कधीच कोलमडणार नाही याची शाश्वती एक परिचारिका म्हणून तरी नक्कीच देऊ शकते.सर्व परिचारिकांना परिचारिका दिनानिमित्त या लेखातून एकच सांगावसं वाटेल की आपल्या प्रोफेशनल सोबत एकनिष्ठ राहून काम करण्याची पद्धती अवलंबून तेच आपल्या आचरणात आणावे ज्यामुळे प्रोफेशन ला कुठल्याही पद्धतीची काळीमा लागणार नाही याची काळजी घ्यावी.कारण नर्सेस आर व्हॉइस टू लीड विजन फोर फ्युचर हेल्थकेअर.महाराष्ट्रातील सर्व परिचारिका ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या, तसेच पीएससी,सब सेंटरला काम करणाऱ्या परिचारिका आणि बीएमसी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका आणि शिकाऊ परीचारिकाना जागतिक परिचारिका दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. केवळ पैसे कमविण्यासाठी डॉक्टर नर्स यांची नोकरी नसते मानव सेवा हाच मोठा संकल्प घेऊन शिक्षण,प्रशिक्षण आणि नंतर वेळेचे काळाचे भान न ठेवता निरंतर सेवा देणे हेच मुख्य ध्येय ठरले जाते.

✒️लेखिका:-भाग्यश्री सानप के ई एम हॉस्पिटल परेल,मुंबई.