अमेरिकेत सायबर हल्ला भारतासह सर्व देश अलर्ट

20

जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना म्हणजे एकप्रकारचे जैविक अस्त्र आहे असे जाणकारांनी या आधीच सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तसंस्थेने चीनने जीवघेण्या विषाणूंचा वापर शस्त्र म्हणून करण्यास पाच वर्षापूर्वीच सुरवात केली होती असे म्हटले आहे. सार्स विषाणू हा त्याचा पहिला प्रयोग होता असाही दावा या वृत्तसंस्थेने केला आहे याबाबतचे पुरावेच त्यांनी जगजाहीर केले आहे. तसेही तिसरे महायुद्ध हे प्रत्यक्ष रणांगणात न लढता आभासी पद्धतीने आणि जैविक अस्त्रांच्या साहाय्याने लढले जाईल असे भाकीत अनेज जाणकारांनी यापूर्वीच केले आहे. कोरोना विषाणूच्या हल्ल्यानंतर नंतर आता जगावर सायबर हल्ल्याचे संकट आले आहे. त्याची सुरवात अमेरिकेत झाली आहे. कोलोनियल पाईपलाईन या अमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधन पाईप लाईन कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेत आणीबाणी जाहीर केली आहे. डार्क साईड या रशियातील हॅकर्सने हा हल्ला घडवून आणल्याचे अमेरिकेच्या एफबीआयने जाहीर केले आहे. हॅकर्सने संगणकीय प्रणालीतील सर्वात घातक रॅम्सवेअरचा वापर या हल्ल्यात केला आहे. रॅम्सवेवर द्वारे संगणकीय नेटवर्क लॉक करण्यात येते हा रॅम्सवेअर संगणकीय प्रणालीत घुसून महत्वाचे फाईल, फोल्डर काबीज करतात त्यानंतर हॅकर्स या फाईल फोल्डर पुन्हा कंपनीला देण्यासाठी मोठ्या रकमेची खंडणी मागतात. डार्क साईड हॅकर्सने सुद्धा कोलोनियल पाईपलाईन कंपनीची सर्व माहिती जमा केली केली असून पुन्हा ती माहिती कंपनीकडे देण्यासाठी बिटकॉईन पद्धत्तीने खंडणी मागितली आहे.

या हॅकर्सने याआधीही अमेरिका आणि युरोपातील अनेक कंपनीचे संगणक हॅक करून सायबर हल्ले घडवून आणले आहेत. यावेळी त्यांनी थेट अमेरिकेतील इंधन कंपनीलाच टार्गेट केले असल्याने अमेरिकेत खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमध्ये टेक्सास ते न्यू जर्सी डिझेल, गॅस आणि जेट इंधनाचा ४५ टक्के पुरवठा याच पाईपलाईन मधून होतो. या महत्वाच्या इंधन कंपनीवर सायबर हल्ला झाल्यापासून अमेरिकेतील इंधनाचे दर वीस ते तीस टक्क्याने वाढले आहेत. ही पाईपलाईन लवकर सुरू झाली नाही तर अमेरिकेतील इंधनाचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेतील या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यानंतर भारतासह सर्व देश अलर्ट झाले आहेत. सर्व देशांनी आपल्या इंधन कंपन्यांना त्यांच्या संगणक प्रणालीची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात कोरोना सारख्या जैविक हल्ल्यासोबतच सायबर हल्ल्यापासून देशाला वाचवण्याची मोठी कसरत भारतासह सर्व देशांना करावी लागणार आहे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)९९२२५४६२९५