ब्रह्मपुरी -आरमोरी राज्यमहामार्ग ठरतोय! प्रवाशांना धोकादायक?

33

🔸नागपूर सा. बां. वि. कामचुकारपणा चव्हाट्यावर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.13मे):- सरकारने नागपूर- गडचिरोली मुख्य मार्गाचे काँक्रीट रोडचे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते त्यानुसार या काँक्रीट रोडच्या कामाचे टेंडर मुंबई येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले त्यानुसार सदर कंपनीने मार्च 2017 दोन पत्री काँग्रीट रोडच्या कामाला सुरुवात केली सन 2019 मध्ये काम पूर्णही केले.

मात्र गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने 29 व 30 ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराने दोन पत्री असलेल्या रस्त्यांपैकी एक पत्री काँक्रीट रोड पूर्णत: खराब झाल्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
353 डी राज्य महामार्ग( चै, नं,126/080) ब्रह्मपुरी आरमोरी दोन पत्री काँक्रीट रोड वरील रणमोचन फाट्या लगत जवळपास 400 मिटर एक पत्री रस्ता पूर्णता निकामी झाला असून रात्रीच्या वेळी मोटारसायकलने प्रवास करताना बरेचशा प्रवाशांचा सदर ठिकाणी अपघात झालेले असून बऱ्याच पैकी लोकांना अपंगत्व आले आहे तर एक दोन प्रवासी नागरिकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना राज्य मार्गावरील काँक्रीट रोड बाबत सूचनाही देण्यात आल्या असून अनेक पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे मात्र संबंधित विभागाचे अधिकारी राज्य महामार्गावरील काँक्रीट रस्त्याकडे जानीव पूर्वक अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः रन मोचन फाट्या लगत असलेल्या काँक्रीट रोडची पाहणी करून सबंधित विभागाशी चर्चा करून मुख्य मार्गावरील काँक्रीटच्या रोडची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सदर ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.