फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुहास गोडबोले यांचे कोरनाने दुःखद निधन

48

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई सर्कल प्रतीनीधी)मो:-9763463407

घाटनांदुर(दि.13मे):-कोरोनाच्या विळख्यात अनेकांना जिव गमवावे लागले आहेत. आज मौजे घाटनांदुर येथील सुहास दीनकर गोडबोले यांचे कोरनामुळे स्व. रा. ती रुग्णालयात अंबाजोगाई येथे निधन झाले. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख होती.अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा निवडणुकीत त्यांनी जोमाने कार्य केले होते.यामुळे ते ग्रामीण भागात चर्चेत होते.

कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक दीवस धडपड केली.परंतु त्यांना यश आले नाही. आणि काल दुपारी बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आठदीवसापुर्वी त्यांच्या मातोश्री चे ही निधन झाले होते. आज त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुल आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.