मांदुर्णे येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी यांना सरपंच यांच्याकडून निवेदन

33

✒️मांदुर्णे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मांदुर्णे(दि.13मे):-चाळीसगांव – सध्या कोरोनाची दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या साथीवर सध्या तरी लस हा एकमेव उपाय आहे. सायगाव येथे लसीकरण सुरू आहे परंतु मांदुर्णे गावातील ग्रामस्थांचा लवकर नंबर लागत नसल्याने बरेचजण लसीकरणापासून वंचित आहेत.

ही बाब लक्षात घेऊन आज रोजी मांदुर्णे गावचे सरपंच दगडू गणपत पाटील व सदस्य गोरख आत्माराम पाटील यांनी शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना मांदुर्णे गावात लसीकरण केंद्र सुरू करण्या संदर्भात निवेदन दिले.

सध्या मोठ्या गावात केंद्र सुरू करून आजूबाजूच्या गावांना तेथे लसीकरनासाठी बोलविले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

परंतू मांदुर्णे गावात लसीकरण केंद्र सुरू करणे फारच गरजेचे असल्याचे महत्व सरपंच दगडू पाटील,सदस्य गोरख पाटील,ग्रा.पं. कर्मचारी दीपक महाजन यांनी पटवून दिले.

वैद्यकीय अधिकारी यांनी प्रयत्न करून मांदुर्णे गावात लवकर केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

सदर निवेदनाची प्रतिलिपी मा.आमदार मंगेश दादा चव्हाण,जि. प.सदस्य भूषण दादा पाटील,पं. स.सदस्य सुनील बापू पाटील यांना देण्यात आल्या आहेत.सर्वांच्या प्रयत्नांने गावात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा ग्रामपंचायत यांच्याकडून प्रयत्न होत आहे.