भाजीपाला उत्पादकानवर व पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना निर्बंध लावू नये – कैलास फाटे

31

🔹लॉकडाऊन मुळे शेतकाऱ्यांसोबत उपभोक्त्यांची उपासमार

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)मो:-7770010084

खामगाव(दि.14मे):- कोरोनाच्या निर्मित वाढत्या प्रादूर्भाव मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर लॉकडाऊन लावले परंतू निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांच्या नाशवंत भाजीपाला, शेती पेरणी ची वेळ, गरीब व सामान्य जनतेला जीवनावश्यक असलेला भाजीपाला, रोजच्या मजुरीवर पोट असणाऱ्या मजुरांचा विचार न करता. आपल्या महालातल्या आयुष्याला गृहीत धरून घेतलेला निर्णय दिसतो असा आरोप सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी केला आहे.मानवाला जीवन जगण्यासाठी जेवणात भाजीपाला आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी शाकाहारी आहारात भाजीपाला अत्यावश्यक आहे. तो भाजीपाला फक्त शेतातच पिकतो आणि उपभोक्त्यांना त्याच्या खरेदीसाठी विक्रेत्याकडे जाणे आवश्यक असते किंवा विक्रेत्याला उपभोक्त्यापर्यंत पोहचणे आवश्यक असते आणि कोणताच शेतकरी प्रत्येक्षात उपभोक्त्यापर्यंत किंवा किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सोडून अतोनात नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे व उपभोक्त्यांना सुद्धा आपला आहार कडधान्यावर भागवावा लागत आहे.

आता पेरणी ची वेळ तोंडावर आली असतांना शेतीच्या कामासाठी डिझेल पेट्रोल ची आवश्यकता असते, बीजवाई खते घेण्यासाठी पिककर्ज ची आवश्यकता असते. ते कधी वेळेवर मिळाले नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू शकतो हे जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावे. फक्त महालातल्या मूठभर लोकांना गृहीत धरून निर्णय लादणे फार काळापर्यंत योग्य होणार नाही अन्यथा मरता क्या नही करता ही परिस्थिती पाहायला मिळेल. याची जाणीव राज्यकर्त्यांनी सुध्दा ठेवावी आपल्या पक्षीय वादापोटी जनतेच्या जीवनाशी खेळणं बंद करा असेही फाटे यांनी म्हटले.एकीकडे निवडणूक क्षेत्रात लाखोंच्या सभा घेणे व त्या क्षेत्राबाहेर आले की कोरोनाच्या भीती दाखवत सोशल डिस्टशिंग चे डोज पाजणे हे न समाजण्या एवढी जनता मूर्ख नाही याचा बांध एकदिवस जरूर फुटेल असे आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये फाटे यांनी म्हटले आहे.