रिपब्लिकन योद्धा पुरस्कार दादासाहेब ओव्हाळ यांना जाहीर

27

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.14मे):-बंधुत्व प्रतिष्ठान’तर्फे बंधुत्व रिपब्लिकन योद्धा पुरस्कार रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांना जाहीर करण्यात आलेला आहे. अशी माहिती संस्थापक अनिल वीर यांनी दिली.सन १९९१ पासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.यामध्ये सर्व राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. प्रामुख्याने वंचित’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (आप्पा) खंडाईत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)- जिल्हाध्यक्ष अशोकराव(बापू) गायकवाड यांना पूर्वीच बंधुत्व पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचेच कार्य अल्पावधीत ओव्हाळ यांनी उभे केलेले आहे.

याशिवाय,वृक्षमित्र प्राचार्य आप्पासाहेब पानवळ,संभाजी ब्रिडेड’चे कार्याध्यक्ष-प्रवक्ते श्रीमंत कोकाटे,शहीद गजानन मोरे व शेळके,महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष ता.का. सूर्यवंशी,ओसवाल प्रतिष्ठान’चे संस्थापक पोपटलाल ओसवाल, प्रा.चंद्रकांत गीते,कोयना शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील व अनंत देसाई, बँकेचे चेअरमन अनंत देसाई, भारतीय बौद्ध महासभेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कालकथीत विष्णू (भाऊ) सत्वधीर,प्रा.सुमनताई पाटील, कोयनाकृपा’चे संपादक संपत देसाई, ज्येष्ट नेते राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भिलारे,सभापती संजय गायकवाड, काँग्रेस’चे किसन भिलारे,साहित्यिक डॉ.रघुनाथ केंगार,ऍड. वर्षा माडगूळकर, कविवर्य रघुनाथ तावरे,मराठा महासंघाचे भीमराव महाडिक, अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे कार्यवाह उमेश चव्हाण (त्यावेळी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा बाहेर दौरा होता.

म्हणून चव्हाण यांना सन्मानीत करण्यात आले होते.), आरोग्याधिकारी डॉ.वि.द. सवाखंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले,प्रा.रामचंद्र निकम,चित्रकार श्याम भोळे आदी व्यक्ती/संस्था यांना गौरविण्यात आलेले होते. यावरूनच संस्थापक यांनी सर्व बाबतीत सर्वधर्मसमभाव राखून प्रथमपासूनच समतोल राखल्याचेच आढळून येत आहे. सन २०१५ साली प्रतिष्ठान’चे रौप्यमहोत्सवी वर्ष होते तेव्हा विविध गुणवंताना गौरविण्यात आले होते. तेव्हा बंधुत्व पुस्तक प्रकाशन’ही झाले होते.यावर्षीही संस्थापक यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अलौकिक कार्य करणाऱ्यानांही गौरविले जात आहे.