रमाई आवास योजने अंतर्गत मिळालेल्या घरकुलाच्या पैशा मधुन लाभार्था कड्डन पैशाची मागणी

    38

    ✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

    पुसद(दि.16मे):-तालुक्यातील येहळा येथील रमाई आवास योजने अतर्गत लाभार्थी श्री हनुमान देविदास बेहड़े यांना सन २०१८ ते २०१९ मध्ये घरकुल मंजूर झाले होते,त्या मंजूर झालेल्या घरकुलाचा प्रथम हप्ता पंधरा हजार१५००० रुपये लाभार्थी यांना देण्यात आला होता,पंरतु दुसरा हप्ता काढण्याकरीता नंतर निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून श्री हनुमान बेहड़े यांना हेतूपुरस्पर फिरवण्यात आले.

    या बाबत प,स,येथील कर्मचारी यांना विचारणा केली असता, निधी उपलब्ध असल्याची माहिती श्री बेहड़े यांना मिळाल्याने त्यांनी संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता ते त्यांना असे म्हणाले की उर्वरित निधी पाहिजेत असेल तर मला 25 हजार रुपये द्या अन्यथा तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा, असे सांगण्यात आले.

    त्यामुळे लाभार्थी श्री हनुमान बेहड़े यांनी या प्रकरणाची माहीती सामाजीक कार्यकर्ते तथा संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप भिम पॅंथर न्यायाची डरकाळी यांना कळविले,या प्रकरणाची तात्काळ चौकशी न झाल्यास व कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत येहळा येथीलं कार्यर्रत असलेले सचिव यांच्या विरोधात भिम पॅंथर संघटने सह बेहडे परिवार लोकशाही मार्गाने उपोषणाला बसत असल्याचा इशारा घरकुल लाभार्थी श्री हनुमान बेहड़े यांनी दिला आहे,,, ~~~~~~~~~~~~~~~~~~