खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले देशमुख कुटुंबियांचे सांत्वन

38

🔹योगेश देशमुख यांना दिला धीर

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.16मे):- तालुक्यातील हणेगाव येथील देशमुख घराण्यात जन्म घेतलेले पण लहान ते मोठ्यापर्यंत माणुसकीची जाण असणारे व सर्वांना आपुलकीने बोलणारे राजकारणात स्वतःची छाप पाडणारे स्व.विलासराव देशमुख ते स्व.शंकररावजी चव्हाण तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या जवळ आपली छाप पाडणारे स्व.आबासाहेब माणिकराव देशमुख यांचे दिनांक २७ -४- २०२१रोज मंगळवारी संध्याकाळी सात वाजता दुःखद निधन झाले होते.

तरी त्यानिमित्त नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिनांक १५-५-२०२१ रोजी आबासाहेब माणिकराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व येथील सामाजिक कार्यकर्ते व आबासाहेब देशमुख यांचे पुत्र योगेश देशमुख यांना धीर देऊन सांत्वन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,श्रावण पाटील भिलवंडे(जिल्हा सरचिटणीस भाजपा ), ॲड.प्रितमजी बाळासाहेब देशमुख ,(राष्ट्रीय कॉग्रेस तालुका अध्यक्ष देगलूर )लक्ष्मण ठक्करवाड, मारुती वाडेकर शंकरराव राठोड (जिल्हाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती )धोंडीबा मिस्त्री ,प्रा.उत्तम कुमार कांबळे सुकुमार देवाडे ,अशोक गंदपवार (नगरसेवक देगलूर )प्रशांत दासरवाड (नगरसेवक देगलूर) रमेश राणे (तालुका उपाध्यक्ष भाजपा )विवेक पडकंटवार (मा उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती हनेगाव) हज्जू सेठ चमकुडे (माजी प.स.सदस्य), शिवकांत माळगे सचिन गिरेवाड ( भाजपा संपर्कप्रमुख )योगेश देशमुख व अजित बिरादार पोलिस उपनिरीक्षक मरखेल , संजय बरबडेकर आदीजण उपस्थित होते