सर्पमित्रांनी दिले सापाला जीवनदान

24

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.18मे):-तालुक्यातील गांगापुर येथील गावकरी सुरेश येलके यांचे निवासस्थानी आढळलेल्या सापाला सर्पमित्रानी जीवदान दिले.गांगापुर येथे सुरेश येलके यांच्या घरी साप असल्याचे निदर्शनास आल्याने सर्पमित्र आनंदसिंग,मयूर उइके,प्रकाश वाघ यांना पाचारण करण्यात आले.

या सर्पमित्रांनी येलके यांच्या घराच्या स्वयंपाकघरातून ३ फुट लांबीच्या गवाऱ्या जातीच्या सापाला पकडले. सर्पमित्रांनी व चमुने नंतर या सापास खापरी येथील जंगलात सुखरूप सोडून दिले. यावेळी आनंद सिंग, लोकेश राऊत,सचिन महाजन उपस्थित होते,