अखेर वारकऱ्यांच्या समोर आ संजय गायकवाड यांना माफी मागावी लागली

42

✒️विषेश प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.18मे):-माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सांगण्यावरून बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव साहेब आणि मुंबई येथील खासदार श्री विनायकराव राऊत साहेब यांनी केली मध्यस्थी व वारकरी वादळ थांबवले.

ज्यांच्या आई-बहिणीवरून शिवीगाळ केली त्या प्रकाश महाराज पांडे यांना आमदार संजय गायकवाड यांची माफी मागण्या करता टाळाटाळ केली पण खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी प्रकाश म पांडे यांना फोन केला व सांगीतले आ गायकवाड माफी नसेल तर शिवसेना पक्षाच्यावतीने मी माफी मागतो पण वाद मिटवा आणि मला वारकऱ्यांची माफी मागण्यांमध्ये कमीपणा नाही कारण की मी सुद्धा वारकरी आहे माझ्या घरी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह असतो असे उद्गार खासदार प्रतापराव जाधव यांनी काढले

हा विजय पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा आहे . पत्रकार बांधवांन मुळे हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात गेलेले आहे म्हणून सर्व पत्रकार बांधवांचे जाहीर आभार

बुलढाणा येथील आ संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावरून वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसापासून फार मोठे वादळ उठले होते आणि आ संजय गायकवाड यांनी उपवास तपास बंद करून मासाहार चालू करण्याचे हिंदू धर्मियांना आव्हान केले होते त्यामुळे वारकऱ्यांची भावना दुखावल्या आणि अशा प्रकारचे विधान कोणत्या आधारे केले विचारन्या करीता फोन केला असता आमदार संजय गायकवाड यांनी बऱ्याच महाराज मंडळींच्या सोबत खालच्या दर्जाचे बोलून आई बहिणीवर शिवीगाळ केले व त्या रेकॉर्डिंग पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या महाराष्ट्रातील वारकरी संघटना व वारकरच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांना माफी मागण्याची विनंती केली.

असता मी माफी मागणार नाही असे विधान संजय गायकवाड यांनी केले आणि म्हणून नाईलाजाने विश्व वारकरी सेनेच्या वतीने अकोला, बुलढाणा ,अमरावती ,वाशिम ,नाशिक, औरंगाबाद ,सांगली ,सातारा अश्या बऱ्याच जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये धार्मिक भावना दुखवून कीर्तनकार मंडळींना आई बहिणीवर शिवीगाळ केल्याबद्दल यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा अशा आशयाची तक्रार नोंदविण्यात आली . सदर प्रकरण वारकऱ्यांसी संबंधित असल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सांगण्यावरून खासदार प्रतापराव जाधव आणि खासदार विनायकराव राऊत साहेब यांनी गणेश महाराज शेटे यांना फोन केला व संजय गायकवाड यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे या मताचा आणि शिवसेना पक्षाचा काहीएक संबंध नाही पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या मुळे आम्ही शिवसेना पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व संत मंडळींची माफी मागतो आणि घडलेल्या प्रकाराबद्दल आ संजय गायकवाड ला सुद्धा वारकऱ्यांची माफी मागायला सांगतो.

आणि काही वेळानंतर लगेच आ संजय गायकवाड यांचा माफीचा व्हिडिओ आला तो व्हिडिओ पाहत असताना आम्हाला अपेक्षित आहे तशा नम्रतेने व इतर कोणतेही विषय न घेता माफी हवी होती पण वारकरी संप्रदायातील वरिष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी व खासदार माननीय प्रतापराव जाधव यांच्या सांगण्यावरून आम्ही शांत बसत आहोत. सदर सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार प्रतापराव जाधव साहेब, खासदार विनायकराव राऊत साहेब यांचे महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानतो त्याचप्रमाणे ते प्रकरण ज्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधव व राजकीय नेत्यांच्या पर्यंत पोहोचले त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे महाराष्ट्रातील सर्व संत मंडळींच्या वतीने जाहीर आभार. या प्रकरणावर आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने सध्या दुर्लक्ष करीत आहोत पण महाराष्ट्रातील इतर एखाद्या वारकरी संघटनेने किंवा एखाद्या कीर्तनकार महाराजांनी आ संजय गायकवाड यांची कुठे तक्रार केली.

तर आपल्या स्थरावर पाहावे आमची योग्य ते सहकार्याची भूमिका राहीलच .आणि जो शाब्दिक वाद निर्माण झाला होता तो मिटलेला आहे पण वारकऱ्यांच्या मनात जर आल तर वारकरी आपल्यापुढे कोणालाही झुकवू शकतात हे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या एकोप्याचा मुळे सर्वांना दिसून आलेले आहे. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना आपापल्या परीने आपल्या ताकतीने समोर आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानत आहे