देवितांडा येथील पाणी पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत

17

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिध)

तलवाडा(दि.21मे):- येथील देवी तांडा कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जाधव एलजी सर यांनी सरपंच व उपसरपंच यांना विनंती केल्यानंतर पाणीपुरवठा बद्दल तात्काळ दखल घेऊन देवी तांडा येथील अनेक वर्षापासून चा प्रश्न आज   कायम स्वरूपी मार्गी लावण्यात आला.
 ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू हात्ते उपसरपंच अज्जुशेठ सौदागर यांनी विशेष दखल घेऊन मागील तीन दिवसापासुन उपसरपंच अज्जुशेठ सौदागर यांनी अथक परिश्रम घेऊन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेऊन आज दि.21/05/2021 शुक्रवार रोजी प्रत्येकक्ष  पाणी सुरू करून देवितांडा करांचा कायमचा पाणी पुरवठा सुरळीत केला.
या वेळी देवितांडा येथील जेष्ट नागरीक देविदास मिठ्ठु राठोड,अंबादास मुन्ना राठोड,  श्रीराम आलु राठोड, रोहीदास किसन राठोड,डिंगाबंर सुखदेव पवार, पञकार विष्णुपंत जेमा राठोड शिक्षक शिवाजी महाराज राठोड, महादेव राठोड, ह.भ.प.विठ्ठल महाराज राठोड, अर्जुन जाधव, गणेश जाधव यांनी समस्त लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले  या वेळी सदस्य नारायण मरकड व लहुराव जाधव उपस्थित होते.