कडक संचारबन्दीत हॉटेल रायगडवरती विवाह समारंभ- धाड टाकून केली दंडात्मक कार्यवाही

27

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.22मे):-कडक संचारबन्दीचे काळात शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल रायगडवरती विवाह समारंभ पार पडतांना धाड़ मारल्याची घटना आज सकाळी घडली.

आज आयोजित विवाह यापुर्वी संचारबंदीचे कारणावरुन चार वेळा स्थगित करण्यात आला होता,शेवटी आज दि.२२ रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक रायगड हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले.आज या नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी हॉटेल रायगड येथे धाड़ मारित कारवाई केली.सदर विवाहाचीप्रकरणी वधु तसेच वर पक्षावर कोविड नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

फक्त हॉटेल संचालक भारत येनोरकर यांचेकडून ३० हजार रुपये नाममात्र दंड वसुल करण्यात आला.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात गेल्या ८ मे पासून कडक संचारबन्दी आदेश लागू केलेला आहे.परंतु अशा आयोजनामुळे कोरोना प्रादुर्भाव कसा करता येईल? उपरोक्त विवाह प्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई न करता फक्त दंडात्मक कारवाईच केल्याने कोरोना प्रतिबंध कसा करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.