चिचघाट येथे वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला

23

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.२१मे):-जुन्या वादातुन एका वृद्ध महिलेवर कुराडीने हल्ला केल्याची घटना नजीकच्या चिचघाट येथे घडली असून या प्रकरणी आरोपीस हिंगणघाट पोलिसांनी अटक केली.
चिचघाट येथील दिनेश आडे(३२) याचा गावातील वृद्ध महिला चंद्रकला रामाजी सरमाके (६०) हिचेसोबत जुना पारिवारिक वाद होता.

या वादातुन काल दि.२० रोजी आरोपीने चंद्रकला सडमाके या महिलेवर सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान कुराडिने प्राणघातक हल्ला केला.दिनेश आडे याला त्याचे भाऊसुनेला पळवुन जाण्यामध्ये चंद्रकलाने मदत केली असल्याच्या संशयावरुन दिनेश याने सदर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

जखमी चंद्रकलाला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचारार्थ भरती करण्यात आले,डॉक्टरांनी तिची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामूळे पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठवीले. आरोपी दिनेश आडे याचे विरुद्ध भादवीच्या कलम ३०७ ,५०४ , ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक अभिषेक बांगडे, पोहवा महेंद्र आकरे करीत आहे