खामगाव शहरातील कोवीड हेल्थ सेंटर बनले लुटारूंचे सेंटर

30

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.23मे):-महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ठेवून घेत केली बिलाची वसुली खामगाव च्या अश्विनी नर्सिंग होम कोवीड हेल्थ सेंटर मधील चीड आनणार्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जिल्हा शल्य चिकित्सक जिल्ह्यातील वैध व अवैध कोविड हेल्थ सेंटर कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत बेंडुक खाल्लेल्या सापाप्रमाणे सुस्त पडुन पाहतात जिल्ह्याचा कारभार मात्र जनता कोवीड हेल्थ सेंटरच्या पठाणी वसुलीमुळे त्रस्त असल्याचे सर्वत्र चित्र पहायला मिळत आहे* याबाबत सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ऊपविभाग अंतर्गत खामगाव शहरात अश्विनी नर्सिंग होम कोवीड हेल्थ सेंटर हे जलंब रोड खामगांव येथे आहे.

या कोवीड हेल्थ सेंटर मध्ये कोरोना पेशंट वर उपचार होत असल्याने खामगाव शहरासह तालुक्यातील रुग्ण दाखल होऊन ऊपचार करत आहेत आवार येथील एक पुरुष अंदाजे पाच ते सहा दिवसापासून तेथे उपचार घेत होता उपचारादरम्यान वेळोवेळी त्याच्या नातेवाईकाने पैसेसुद्धा हॉस्पिटल च्या काउंटरवर जमा केले होते या दरम्यान पेशंट ची तब्येत चांगली झाल्यामुळे सदर पेशंटच्या सुट्टीच्या दिवशी उपचारादरम्यान जमा केलेल्या रुपयापेक्षा अश्विनी नर्सिंग होम कोवीड हेल्थ सेंटर कडून जास्त बिल निघाल्याने सदर पेशंटला आम्ही घरी घेऊन जातो व पैसे घेऊन येतो असे पेशंट च्या नातेवाईकाने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली पेशंटच्या नातेवाईकांची विनंती मान्य केली नाही.

मग तुमचा कर्मचारी आमच्या सोबत आमच्या घरी पाठवा आम्ही त्याला बाकीचे पैसे देतो असे सुध्दा पेशंट च्या नातेवाईकाने पुन्हा विनंती तेथील कर्मचाऱ्यांला केली ते जमत नाही पैसे आताच नगदी जमा नाहीतर पेशंट घेऊन जाऊ नका असा तेथील कर्मचाऱ्याने पेशंटच्या नातेवाईकांना दम भरला आम्हाला डॉक्टर साहेबांचा आदेश आहे पैसे नगदीच लागतील नाहीतर पेशेंटच्या सोबत असलेल्या महीलेच्या गळ्या मध्ये असलेली सोन्याची पोत येथेच ठेवून द्या लागले तर तुम्ही पोती चे फोटो तुमच्या मोबाईल मध्ये काढून घ्या पैसे आणल्यावर पोथ घेऊन जा असे सांगून महिलेच्या गळ्यातील पोत तेथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवून घेत सावकारा सारखी पठाणी वसुली केली अश्विनी कोवींड सेंटर *लुटारूंचे सेंटर* म्हणून शहरात नावारूपास येत आहे.

येथे घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेहमीच एटीट्यूट मध्ये राहणारे डॉक्टर व व तेथील कर्मचारी भानावर आले व प्रकरण मॅनेज करण्याकरिता धावपळ करत संबंधित पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना हेरत त्यांच्या सोबत गोड गोड बोलून प्रकरण मॅनेज केल्याने संबंधित पेशंट व त्याचे नातेवाईक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत तरी अश्विनी नर्सिंग होम कोवीड हेल्थ सेंटर चालवणारे डाँक्टर्स यांच्यासह इतरांवर त्वरित कार्यवाही व्हावी व आतापर्यंत त्यांनी किती गोरगरिबांचे दागिने काढून घेतले यांची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे.

पालकमंत्री व अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे साहेबांनी आता तरी दरोडेखोर कोवीड हेल्थ सेंटर वर कणखर भुमिका घेऊन कार्यवाही करावी जेणेकरून करून जिल्ह्यात व महाराष्ट्रात असा प्रकार पुन्हा घडणार नाही त्याच बरोबर वैध व अवैध कोवीड सेंटर कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून बेंडूक खाल्लेल्या सापाप्रमाणे सुस्त पडलेले जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना वठणीवर आणण्याची मागणी होत आहे