कोरोनामुळे कुटुंबप्रमुख दगावल्यास आदिवासी विकास विभाग ने त्वरित मदत करावी

    43

    ?अ.भा.आदिवासी विकास परिषदचे विदर्भ युवाध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांची मागणी

    ✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

    हिंगणघाट(दि.23मे):-मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वाढला असल्याने शासनाने सर्वच गोष्टींवर प्रतिबंध लावले आहे.या प्रतिबंधाचा आदिवासी समाजावर विपरीत परिणाम झाला आहे.रोजमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालविणारे कुटुंबप्रमुख या आजाराने ग्रस्त होऊन मृत्युमुखी पडत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये या करिता अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे युवा विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांनी वर्धा प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांच्या मार्फत अप्पर आयुक्त एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांना निवेदन दिले आहे.

    निवेदन मध्ये कोरोनामुळे कुटुंबप्रमुख दगाविलेल्या परिवारास आदिवासी विकास विभागाने आर्थिक सहयोग करणे आवश्यक असल्याचे परंतु आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आजपर्यंत या बाबतीत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचे नमूद आहे.कुटुंबप्रमुख दगविलेल्या आदिवासी परिवारावर किती संकट कोसळतात याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत चंद्रशेखर मडावी यांनी व्यक्त केले.त्यांनी अश्या प्रसंगी आदिवासी विकास विभागाने त्या परिवारास आर्थिक सहयोग सहित विभागातील ईतर योजनांमध्ये विशेष प्राधान्य देण्यात येण्याची तसेच सदर लाभ देत असताना कागदपत्र च्या जाचक अटी न ठेवता मौका चौकशी करून तात्काळ मदत देण्याची तरतूद करण्यात यावी अशी मांगणी केली.

    कागदपत्रे च्या जाचक अटीमुळे मागील 1 मे 2020 ला घोषित “खावटी अनुदान योजना” वर्ष लोटूनही लाभार्थ्यांपर्यंत पोहचू शकली नाही.आदिवासी विकास विभाग कोरोना काळात निष्क्रिय दिसत असल्याने आदिवासी निराश आहे असा आरोप अ.भा.आदिवासी विकास परिषद ने लावला आहे.निवेदन देताना विदर्भ युवा अध्यक्ष चंद्रशेखर मडावी,शहराध्यक्ष विक्की वलके, उपस्थित होते.