!! रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान !!

23

🔹कार्यसम्राटआमदार समीरभाऊ कुणावर

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.24मे):-दिनांक 23- 05- 2021 ला रक्तदान शिबिराचे आयोजन अनुसया पॅलेस हिंगणघाट येथे करण्यात आले. या शिबिराचे पूजन *मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार* *यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणघाट शहराचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष मा. प्रेम बाबू बसंतानी उपस्थित होते.*

सध्या देशाला रक्तदानाची आवश्यकता असून सर्व दवाखान्यामध्ये पेशंट मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे लक्षात येताच हिंगणघाट येथील स्थानिक युवकांनी अंत्यत बिकट परिस्तिथी मध्ये संचारबंदीचे नियम पाळून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.सगळीकडे रक्ता चा तुटवडा भासत असल्या मुळे हिंगणघाट येथील युवकांनी पुढाकार घेऊन सेवा फाऊंडेशनच्या मदतीने हिंगणघाट येथील अनुसया पॅलेस येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सदर शिबिरामध्ये किमान १०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले , हिंगणघाट विधान सभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार व नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतांनी यांची प्रमुख उपस्थिती होती..रक्तदान शिबिराच्या यशस्विते करिता महेश घुमडे , अक्षय चंदनखेडे , स्त्यालक्ष जवादे , युवराज खाटीक , उदयराज भोमले , आकाश वागदे , प्रणित झोरे , शुभम खाटीक, आनंद मानकर, आचाल वनकर , मीनल निखाडे ,खुशाल घोडे आणि रोहित तिजारे इत्यादी कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पुढाकार घेतला.