वंदना ग्रुप यांच्या वतीने बुध्दजयंती दिनी वृक्षारोपण व संवर्धन

24

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27मे):- सलग चार वर्षांपासून पुसद शहर व तालुक्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्य करणाऱ्या वंदना ग्रुपने बुद्ध जयंती दिनी वृक्षारोपण व संवर्धन केले कारण की मागील एका वर्षापासून कोरोणा (कोविड-१९) या महामारीच्या आजाराने थैमान घातले आहे .त्यामुळे कित्येक जणांना जीवाला मुकावे लागले आहे.

मानवी शरीराला श्वासोश्वाँस घेण्यास होणारा त्रास म्हणजे शरीराला लागणारा ऑक्सिजनची कमतरता होय.
ही कमतरता भासण्याचे कारण म्हणजे विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ही निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून २६ मे रोजी तथागत गौतम बुध्दांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त पुसद येथील वंदना ग्रुप यांनी पुसद तालुक्यातील बोरी (खु) येथील बुद्धविहार परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करून बुध्दजयंती साजरी केली.

या वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे विपुल भवरे , प्रसाद खंदारे , सध्दम जाधव, निखिल कांबळे, बिपिन हरणे,विशाल डाके, सनी पाईकराव,बुध्दरत्न भालेराव, प्रणव भागवत,अमोल डाके, तेजस वाढवे,अंजिक्य कांबळे, तसेच ईत्यादी वंदना ग्रुपचे कार्यकर्ते आणि बोरी (खु) येथील रहिवासी उपस्थित होते.