पार्ङी येथे चार घराला आग

    36

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.27मे):-तालुक्यातील पार्डी येथे आज 27 जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान चार घराला आग लागली या आगीमध्ये चारही घराचे नुकसान झाले आहे.तसेच येथील विधवा महिला रत्नमाला प्रमोद शिंदे गोपाल शिंदे शंकर शिंदे या तीन घराचे शंभर टक्के नुकसान झाले. याच घराला लागून असलेले अब्दुलभाई यांच्या घराला आग लागली यामध्ये त्यांचेही नुकसान झाले.

    आग इतकी मोठी होती आग विझविण्यासाठी रामदास महाराज.सिध्दांत खङसे.भुजंगराव पानप्पटे.खुशाल केवटे.मनोहर जाधव.सुर्यकांत क्षिरसागार.आनंदराव येरमुलकर.जावेदभाई.सलीमभाई, मनोहर पाईकराव. यांच्यासह महिला व लहान मुलांनी आग विझविण्यासाठी जिवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला आग लागली नाही या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

    यामधे 1)रत्नमाला परमानंद धानोरकर या विधवा एकूण महिलेची 5 लाख 84 हजार रुपयाचे नुकसान झाले यामध्ये रोख रक्कम 1लाख 50 हजार व सोन्याचे दागीने इतर घरातील साहित्य 2) अनुसयाबाई पुंजाजी धानोरकर या वृद्ध महिलेचे एकूण 4 लाख 69 हजार रुपयाचे नुकसान झाले यामध्ये रोख 60 हजार व सोन्याचे दागीने घरातील इतर साहित्य जळून खाक झाले.3) कुसुमबाई बंङू धानोरकर या विधवा महिलेचे एकूण 2 लाख 52 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे .यामध्ये 60 हजार रोख व सोन्याचे दागीने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.4) शेख अब्दुल शेख इब्राहिम यांचे एकूण 1 लाख 69000 रुपयाचे नुकसान झाले आहे यामध्ये रॉक व घरातील साहित्य जळून खाक झाले आहे संपूर्ण साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली

    पुसद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केली लगेच अग्निशामक पार्ङी मध्ये दाखल झाले. वआग विझविण्यात आली. सदर घटनेची वार्ता गावभर पसरतात गावकऱ्यांरी घटनास्थळावर दाखल झाले व आग विझविण्यासाठी मदत केली.

    सदर घटनेचा पंचनामा करताना पुसद पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई. मंडळ अधिकारी एन.आर.वाहुळे. साहेब. तलाठी अमोल राठोड साहेब. ग्रामसेवक ए,बी. जाधव .साहेब बीड जमदार चंदेवाङ साहेब पोलीस शिपाई पंकजभाऊ विद्युत सहाय्यक देवानंद राठोड.कोतवाल सागर गोरे. ग्रामपंचायत कर्मचारी समाधान शिनगारे अरुण बरङे. ग्रामपंचायत सदस्य रामदास केवटे. समाधान केवटे .नंदू कांबळे संजय कानङे.संदीप भोणे. व गावकरी हजर होते.

    ——-
    रत्नमला परमानंद धानोरकर या महिलेच्या पतीचे मागील पाच महिने अगोदर अक्सिडेंट मध्ये निधन झाले आहे तिला दोन मुले असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असते आज सकाळी 10.30 वाजता अचानक तिच्या घराला आग लागली यामध्ये तीच्या घरातील रोख 1लाख 50 हजार व सोन्याचे दागीने व घरातील सर्व साहित्य कागदपत्रे जळून खाक झाली आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न तिच्यासमोर उभा आहे त्यामुळे या महिलेला मदतीची अपेक्षा आहे