अवैध दारू तस्करी करणाऱ्या वर ब्रम्हपूरी पोलिसांची कारवाई

48

🔺एक लाख पंच्यानव हजार रुपयांची अवैध दारू जप्त…

🔺मध्यप्रदेश राज्यातील मधिरा कंपनी ची दारू जप्त…..

🔺ब्रम्हपूरी शहराला नियमित ठाणेदारांची अजुनही प्रतिक्षाच….

🔺ब्रम्हपूरी तालुक्यात तस्करांचे मोठ्या जाळे….

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.27मे):- ब्रम्हपूरी शहर हे विदर्भात शिक्षण व आरोग्य नगरी म्हणून ओळखले जाते.पण एप्रिल 2015 ला राज्य सरकारने दारू बंदी केली.पण यांची हवी तशी अंमलबजावणी झाली.आणि अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या.कमी वेळात जास्त पैसा कमविण्याच्या नादात संपूर्ण जिल्ह्यात आणि ब्रम्हपूरी शहरात अवैध धंद्यांचा हब बनले आहे.ब्रम्हपुरी शहरात अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.पण याकडे पोलिस विभागाची जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बघायला मिळतं आहे. दोन-तीन वर्षात एकुण सात ठाणेदारांची अचानक बदली करण्यात आली.

यांचे मुख्य कारण ब्रम्हपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध दारू तस्करी नुकतेच सतत वादग्रस्त ठरलेले ठाणेदार मर्लिंकाअर्जुन इंगळे यांची चंन्द्रपुर पोलिस कक्षात बदली करण्यात आली. प्रभारी ठाणेदार म्हणुन साहाय्य पोलिस निरीक्षक अनिल कुभंरे यांना पदभार देण्यात आले.पण अजुनही ब्रम्हपूरी शहराला नियमित ठाणेदारच्या प्रतिक्षेत राहावे लागत आहे. ब्रम्हपूरी शहराला ठाणेदार नसल्याने अवैध दारू तस्करी करणाऱ्या ची टोळी सक्रिय झाली असून ब्रम्हपूरी शहरात या काळात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तस्करी जात आहे.

आज मुकबीर यांच्या माहिती वरून आरमोरी रोडच्या बाजूला झुडपात मध्ये अवैध‌ दारू लपवून ठेवली अशी माहिती मिळाली.पोलिसांनी संपूर्ण परिसर शोधून काढले त्यामध्ये मध्यप्रदेश राज्यातील मधिरा कंपनी ची देशी दारू १२ पेटी व टायगर कंपनी ची देशी दारू ०८ पेटी अशी एकूण २० पेटी जप्त करण्यात आली.एकुण किंमत एक लाख पंच्यानव हजार दोनशे रुपये आहे. यामध्ये चार आरोपी असुन एक आरोपीस ईश्वर श्रीराम कुर्वे वय ३९ रा.गांधीनगर ब्रम्हपूरी अटक करण्यात आली आहे. तुळशिदास मिसार बेटाळा, मोरेश्वर मिसार बेटाळा ,लालाजी मिसार बेटाळा हे सदर तीन आरोपी फरार आहेत.सदर कारवाई ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक उपरे,बिट शिपाई अरूण पिसे, गेडाम पोलीस यांनी केली.