धुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी बॉटल, मास्क व खाद्यपदार्थ वाटप

23

✒️जयदिप लौखे-मराठे(धुळे तालुका प्रतिनिधी)

धुळे(दि.28मे):- धुळे शहरासह ग्रामीण भागात करण बाबा मित्र परिवाराच्या वतीने गोरगरीब व गरजूंना कोरोना काळामध्ये पाणी बॉटल,मास्क व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. या कार्याची अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे. करण बाबा मित्र परिवाराच्या वतीने नेहमी गोरगरीब व गरजूंना मदतीचा हात दिला जातो.

या कार्यक्रमाच्या वेळी करण बाबा मित्र परिवाराचे सदस्य, सुनिल चौधरी(माजी सरपंच रतनपुरा बोरकुंड), योगेश ठाकरे, निलेश पाटील, सागर ठाकरे, बुधा सोनवणे, किसन ठाकरे, राहुल सोनवणे, राहुल अहिरे, गोविंदा राठोड, जितेंद्र महाजन व करण बाबा मित्रपरिवार आणि धुळे शहरातील नागरिक उपस्थित होते.