लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा तालुका काॅग्रेस च्या‌ वतीने तालुक्यातील उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, शिंदखेडा, दोंडाईचा कोविड सेंटर, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ लि. सोडियम हायड्रोक्लोराईट व फवारणी पंप चे वाटप

35

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

शिंदखेडा(दि.27मे):-महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्प हार अर्पण करण्यात आला. सद्या कोविड सारख्या गंभीर आजारांवर उपाययोजना करण्यासाठी व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण असलेल्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्याठिकाणी फवारणी होणे आवश्यक आहे.

म्हणुन जिल्हा युवक काॅग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा जिल्हा उपरुग्णालय व कोविड सेंटर ला फवारणी करण्यात करिता २५ लि. एका केंद्रास सोडियम हायड्रोक्लोराईट व पंपाचे डॉ.चन्द्रे सर आरोग्य अधिकारी जिल्हा उपरुग्णालय,व जिल्हा उपरुग्णालय स्टाफ यांच्या उपस्थितीत वाटप आज करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राहुल माण क, वसंत कोळी, पुष्पक पाटील(जिल्हाउपाध्यक्ष युवक काँग्रेस धुळे), प्रमोद मराठे,हुसेन बोहरी, कल्लु पठाण,*मोनु शेख,पप्पु सुतारे,गणेश चकने,गोल्डी माणिक,बंटी नगराळे,रोहित नगराळे,निलेश ठाकुर उपस्थित होते