आमदार संजय गायकवाड यांचे वाहन पेटवून भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

22

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.28मे):-विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन पेटवून भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मलकापूर शिवसेना तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख प्रमुख विजय साठे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दि २६ मे रोजी रात्री च्या सुमारास काही अज्ञात व्यक्तीकडून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वाहनाची पेट्रोल टाकी फोडून वाहनावर पेट्रोल टाकून स्फोट करण्याचा प्रयत्न करून भ्याड हल्ला केला. या घटनेचा मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी तालुका प्रमुख विजय साठे सह प्रवीण शेळके, गजानन साठे, संदेश शिंदे, ऋषिकेश डोसे, गणेश पाटील, धनराज पाटील, आदेश शिंदे, संकेत बाळापुरे, विष्णू महाजन आदी पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.