कृषी पदवीधर संघटना विदर्भ प्रदेश युवती प्रदेशाध्यक्ष पदी मयुरी सुरकार तर उपाध्यक्ष पदी प्रतिक्षा थुटे यांची निवड

22

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.28मे):-कृषि पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे. शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्न अन् समस्या सोडविण्यासाठी संघटना सदैव कार्यरत आहे. कृषी पदवीधर संघटना पदाधिका-यांची निवड प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.

यामधे वर्धा येथील मयुरी सुधाकर सुरकार यांची विदर्भ युवती प्रदेशाध्यक्ष पदी तर हिंगणघाट येथील प्रतिक्षा संध्या भास्कर थुटे यांची विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष पदी संघटनेचे संस्थापक सन्माननीय महेशदादा कडुस पाटील, अध्यक्षा मा.मंगलआई कडुस पाटील व उत्तर महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष व विदर्भ युवती निरीक्षक गुंजनताई कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे उद्देश तळागळापर्यंत पोहोचवुन कृषी पदवीधरांचे व शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मयुरी सुरकार यांनी सांगितले तर वरिष्ठांनी दाखविलेला विश्वास व दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा मानस असल्याचे थुटे यांनी व्यक्त केला.