पार्ङी येथील आगग्रस्त कुटुंबाला आ. इंद्रनील भाऊ नाईक यांची भेट

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29मे):- तालुक्यातील पार्डी येथे 27 मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे चार घरांना आग लागली होती.आगीमध्ये चारही घरे जळून राख झाली असून त्यांचा परिवार उघड्यावर आला आहे. पार्डी येथे अचानक सकाळी लागलेल्या आगीत येथील विधवा महिला रत्नमाला परमानंद धानोरकर कुसुमबाई बंङू धानोरकर.अनुसयाबाई पुंजाजी धानोरखर. या तीन घराचे शंभर टक्के नुकसान झाले.

याच घराला लागून असलेले अब्दुलभाई यांच्या घराला आग लागली यामध्ये त्यांचेही नुकसान झाले. पार्डी येथील पीडित हे अत्यंत गरीब असल्यामुळे पुसद विधानसभेचे आमदार आमदार इंद्रनील भाऊ नाईक आज 29 मे रोजी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व आर्थिक मदत देण्यात आली तसेच पुसद चे तहसीलदार अशोक गीते यांच्याकडूनही आर्थिक मदत देण्यात आली तसेच चारही कुटुंबाची अंतोदय राशन कार्ड करण्यात येतील असे सांगितले.

पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री वानखेडे साहेब यांनी शासनाकडून चारही लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न करील असे सांगितले यावेळी पुरवठा निरीक्षक व्यंकट रावलोङ मंङळ अधिकारी वाहुळे साहेब पुसद पंचायत समितीचे अभियंता था.अ.स.राजू पुरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुसद शहराध्यक्ष अभिजीत पानपट्टे,ग्रामसेवक ए.बी .जाधव तलाठी अमोल राठोड ,अमोल सुर्यवंशी , ज्ञानेश्वर वाठ,राजकुमार झरकर, ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे व गावातील नागरीकसलीमभाई ,संदिप भोने, सागर गोरे,अरुण बरडे, समाधान शिनगारे,सुभाष शिंदे ,दिपक शिंदे,
ग्रा.प.सदस्य रामदास केवटे उपस्थित होते.