मांदुर्णे गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न

25

✒️चाळीसगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चाळीसगांव(दि.२९मे):-मांदुर्णे गावात कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न झाले. कोरोना साथीमुळे सगळीकडे हाहाकार माजला असतांना सध्या कोरोना वर मास्क, सॅनिटायझर व लसीकरण हेच उपाय आहेत. मांदुर्णे गावात कोरोना पसरू नये म्हणून ग्रामपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
मास्क,सॅनिटायझर वाटप,मेडिकल कॅम्प या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. लसीकरणचे सायगाव या मध्यवर्ती गावात आयोजन करण्यात आले होते,परंतू ग्रामस्थांना तेथे लस घेण्यास अडचण येत असल्याने सरपंच यांनी वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला.जि.प.सदस्य व पं.स.सदस्य यांनी लसीकरण सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले.

सर्वांच्या पाठपुरावा केल्याने गाव लहान असतानाही गावात लसीकरण सुरू झाले. 45 वर्षे वयाच्या पुढे असणाऱ्या 83 जणांना पहिल्या टप्प्यात लसिकरण करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य,पं.स. सदस्य,सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी जि.प.सदस्य भूषणदादा पाटील यांनी गावकऱ्यांना मास्क वाटप केले. लसीकरण सुरळीत पार पडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी,वैद्यकीय स्टाफ व आशा वर्कर यांनी विशेष प्रयत्न केले.कोरोना साथ प्रतिबंधसाठी मांदुर्णे ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.