जिल्हाधिकारी साहेब ; माळमाथा भागाकरिता रुग्णवाहिका मिळेल का रुग्णवाहिका?

    44

    ?दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका द्या – महावीर जैन

    ✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,धुळे)

    बळसाणे(दि.30मे):- आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हटले जाते, परंतु आरोग्य विभागाने पुर्णतः फज्जाच उडविला असल्याचे माळमाथा परिसरात दिसून येत आहे. साक्री तालुक्यातील दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे धुळे जिल्ह्यातील मोठे आरोग्य केंद्र असल्यामुळे लवकरात लवकर दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धुळे जिल्हा समन्वयक महावीर जैन यांनी पत्रकाद्वारे केली आहे.दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला ७ उपकेंद्र जोडून आहे आणि सोबत २९ गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे या भागांची लोकसंख्या साधारणपणे ६५ हजार च्या आसपास असून देखील दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे धुळे जिल्ह्यातुन मोठे असल्याचे मत जैन यांनी केले. रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी व अपघाताचे किंवा अन्य आजाराचे प्रमाण पाहता रुग्णास जवळील रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका ऐनवेळेस मिळत नसल्याची नाराजगी चा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

    पुर्वी दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ टोल क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाली होती, परंतु सदर रुग्णवाहिका निजामपूर-जैताने येथील आरोग्य केंद्रात गेली असल्याचे दुसाणेसह माळमाथा भागातील ग्रामस्थांनी सांगितले.दुसाणे व परिसरासह रुग्णांचे काय हाल होतील या गोष्टींचा विचार अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केली नसल्याची खंत महावीर जैन यांनी केली आहे. रुग्णवाहिका अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. गरोदर मातेला बाळंतपणा करिता साक्री किंवा धुळे येथे पाठवत असतांना १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधावा लागतो, परंतु येण्यासाठी २ ते ३ तास रुग्णवाहिकेला विलंब लागत असल्याने त्या गरोधार मातेला अनेक वेदना सहन करावा लागतात.शिंदखेडा ते विहिरगाव फाटा या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.

    गतवर्षाच्या ऑक्टोंबर महिन्यात सकाळी सकाळी अपघात झाला आणि त्या घटनास्थळी चा जैन हे साक्षीदार होते अपघात झाल्याने महावीर जैन यांनी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला परंतु रुग्णवाहिकेला अपघात घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत असल्याने जैन यांनी वेळी च दक्षता घेत व रुग्णवाहिकेची वाट न पाहता एका रुग्णास स्वतःच्या मोटारसायकलीवर दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी दाखल केले. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मी स्वतः मदत केली. दुसऱ्या रुग्णाला जास्त मार लागल्यामुळे त्याच्या पुढील उपचारासाठी धुळे किंवा साक्री याठिकाणी घेऊन जावे लागणार होते. परंतु रुग्णवाहिकेला वेळ लागल्यामुळे त्या इसमाला प्राण गमवावा लागल्याचे दुख आज ही मनाला बोचत आहे. अशा दुदैवी घटना परिसरातून बघावयास मिळत असतात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने पुढील उपचार न मिळाल्यामुळे चार ते पाच लोकांचा मृत्यू ही झाल्याचे स्पष्टीकरण महावीर जैन यांनी केले.

    रुग्णवाहिका दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात राहिली असती तर रुग्णवाहिका वेळेवर रुग्णालयात पोहचल्यावर मृत्यूस सामना देणाऱ्या रुग्णाचा आरोग्य देवदुतांच्या उपचाराने जीव ही वाचवण्यासाठी रुग्णवाहिके होती, परंतु ज्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज आहे. त्याठिकाणी न देता भलत्याच ठिकाणी देण्यात आली. वरिष्ठांनी लक्ष घालून तातडीने दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली, तर सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळेलच त्याच बरोबर आर्थिक कचाट्यातून ही वाचतील या उद्देशाने धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या सह आरोग्य विभागाने माळमाथा परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा महावीर जैन यांनी व्यक्त केली.