आष्टी पोलिस स्टेशनच्या वतीने ए.एस .आय.आयुष्यमान संघरक्षित फुलझेले यांचा निरोप समारंभ

46

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

आष्टी(दि.30मे):-मागिल सन २०१३ पासुन पोलिस स्टेशन आष्टी येथे सेवा देत असलेले आणि सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणारे, मनमिळाऊ स्वभावाचे धनी आयुष्यमान संघरक्षित फुलझेले साहेब हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असल्याने त्याचा सेवा निवृत्तीपर तसेच देवानंद नंदेश्वर, बाजीराव उसेंडी,व वंदनाताई कोडापे, या पोलिस कर्मचाऱ्यांचा सुध्दा बदली झाल्याबद्दल निरोप समारंभ पोलिस स्टेशन आष्टी येथे संपन्न झाला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी आयु. फुलझेले यांच्या बद्दल तसेच बदली झालेले श्री नंदेश्वर उसेंडी व वंदनाताई कोडापे यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.सदर निरोप सरंभाला प्रमुख अतिथी म्हणूनआष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.कुमारसिंग राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.धर्मेंद्र मडावी, पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले,व आष्टी पोलिस स्टेशनचे इतर सन्माननिय पोलिस कर्मचारी निरोप समारंभाला उपस्थित होते.