मृत शिक्षकाच्या कुटूंबियांना शिक्षक भारती कडून मदत

29

✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सावली(दि.1जून):-शिक्षक भारती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने मृत शिक्षक जगदीश बाबुराव चिकराम यांचे कुटूंबियांना शिक्षक भारती कडून मदत देण्यात आली.चिकराम हे उपरी हेटी, पं .स. सावली मध्ये कार्यरत होते.त्यांचे यांचे २६ जून २०१८ रोजी देहावसान झाले. त्यापूर्वी सहा महिन्या अगोदर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता.त्यांचे पश्चात कुंटूबात म्हातारे आईवडील व सिमरन आणि स्मिता अश्या दोन सोज्वळ मुली आहेत.

मृत चिकराम यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान किंवा कोणतीही मदत मिळालेली नाही. अश्यात लॉकडाऊनच्या काळात या कुटूंबाची फार वाताहात झालेली होती.हे कुटूंब उघडयावर आले होते. अशा परिस्थितीत शिक्षक भारती जिल्हा चंद्रपूरने मदतीचा हात पुढे करून या कुंटूबाला आधार मिळावा यासाठी १०००० रूपये (दहा हजार रूपये) मदत केली.

आजी,आजोबा व दोन्ही मुलींना हिंमत देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी थोडीफार मदत देऊ असे सांगितले.यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय मिटपल्लीवार, मुल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे,सावली तालुका अध्यक्ष किसन गेडाम उपस्थित होते.यामध्ये जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे व सर्व शिक्षक भारतीच्या मावळ्यांचे योगदान असून सर्वांनी खारीचा वाटा उचललेला असल्याचे जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी यांनी कळविले आहे.