प्रा. किशोर चौरे आचार्य पदवीने सम्मानित

45

✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बल्लारपूर(दि.1जून):-येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातिल इतिहास विभागप्रमुख प्रा. किशोर शेषराव चौरे यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तर्फे आचार्य पदवी बहाल करण्यात आली त्यांचा संशोधनाचा विषय ” महाराष्ट्रातील दलित व बहुजनांच्या उत्थानासाठी केलेले मा. कांशीराम यांचे कार्य- एक ऐतिहासिक अध्ययन” हा होता.

त्यांच्या पीएचडी च्या शोधप्रबंधासाठी त्यांना प्राचार्य डॉ . भुपेश चिकटे शिवाजी महाविद्यालय गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच डॉ. रूपेश मेश्राम, डॉ. प्रफुल्ल राजूरवाडे, डॉ. दिलीप तेलंग,डॉ. मिता रामटेके मॅडम, डॉ. संतोष बन्सोड, डॉ. महेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. कमलाकर तागडे, डॉ. सुशांत चिमनकर, डॉ.जितेंद्र तागडे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे,यांचे अत्यन्त मोलाचे सहकार्य लाभले, त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र मंडळी, ज्यांनी त्यांना त्यांच्या या यशात सहकार्य केले या सर्वांना दिले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.