मालमत्ता कर माफ करा- विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

    71

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.1जून):- कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या कारणाने संपूर्ण देशात मार्च 2020 पासून संचारबंदी आणि टाळेबंदी घोषित करण्यात आली त्यामुळे छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार ,शेतकरी, शेतमजूर रिक्षावाले, टॅक्सी वाले, हात मजूर अशा सर्वांचेच उत्पन्न थांबल्यामुळे ते आर्थिक हलाखीचे जीवन जगत आहे त्यातल्या त्यात केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल गॅसचे भाव वाढवून लोकांचे खिसे कापण्याचे उद्योग सुरू केला आहे . त्यामुळे नेमके जगायचे तरी कसे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतात पिकविलेल्या माल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावात माल विकावा लागला. शेतात लावलेला भाजीपाला बाजारात विकता न आल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यावा लागला. वर्षभर काबाडकष्ट करून आणि तळहातावरच्या फोडासारखे जपून पिकविलेल्या शेतमालाला ग्राहकच न मिळाल्यामुळे ते जनावरांना खाऊ घालावे लागले.

    सण-समारंभ, उत्सव, लग्नकार्य यावर निर्बंध घातल्यामुळे फुल शेती करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अगोदरच शेतकरी वर्ग हा बँक, सावकार, नातेवाईक आणि ज्यांच्या ज्यांच्या कडून कर्ज मिळेल त्यांच्याकडून कर्ज मिळवून आपली शेती व्यवसाय उभा करीत असतो परंतु संचारबंदी आणि टाळेबंदी मुळे व्यवसायच उद्ध्वस्त झाल्यामुळे बँकेकडून, सावकाराकडून, नातेवाइकाकडून घेतलेले कर्ज कसे द्यावयाचे .येणाऱ्या हंगामाकरिता खते बियाणे कसे विकत घ्यायचे, मुला बाळाच्या अन्न वस्त्र आरोग्य, शिक्षणाच्या गरजा कशा भागवायच्या ही विवंचना आहे. वर्षभरापासून कंपन्या- कारखाने यांना टाळे असल्यामुळे अनेकांचे रोजगार जाऊन त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे.

    अनेक कर्मचारी अर्ध पगारी झाले आहे. अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना वर्षभर दुकानच उघडता आले नाही. अधेमध्ये टाळेबंदीत थोडी शिथिलता देऊन काही काळ मर्यादित वेळेत दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. परंतु ग्राहकच नसल्यामुळे या वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे डिसेंबर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्याचा कालावधी हा लग्न समारंभाचा आणि इतर समारंभात असतो पण याच कालावधीत मागील वर्षी आणि या वर्षीही कडक टाळेबंदी असल्यामुळे मंगल कार्यालयाचे मालक त्यांच्यावर आधारित असणारे बँड वाले, घोडी वाले, मंडपवाले ,डेकोरेशन वाले, स वाले फुल वाले या सर्वच व्यावसायिक मंडळींना आर्थिक फटका बसला आहे संचार बंदी मुळे प्रथम निर्बंध घातले गेले ते प्रवासावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था डिकांचे अपरिमित नुकसान झाले टॅक्सी चालवून रिक्षा चालवून उपजीविका करणाऱ्या वर उपासमारीची वेळ आली एसटीला प्रवासी मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची कपात केली त्यामुळे त्यांच्यावर उपजीविकेचे मोठे संकट आलेले आहे हॉटेल्स निवासस्थानाच्या सोयी खानावळी पूर्णपणे बंद असल्यामुळे या व्यवसायिक व्यवसायिकांची ही नुकसान झाले आहे.

    अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक वगळता इतर बहुसंख्य शिक्षकांची परवड झालेली आहे शैक्षणिक संस्था सुरू नसल्यामुळे त्यांचे वेतन थांबले आहे. मुळातच बहुसंख्य विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांना कमी वेतन दिले जाते. शिक्षण संस्था चालक ही या परिस्थितीपुढे हतबल झालेले आहे . नगरपालिकेचे प्रमुख कर्तव्य जनतेला नागरी सुविधा पुरविण्याचे आहे .कोरोणातील लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांनाही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केंद्र सरकारने केलेली नाही. असे असताना नगर परिषदेचे जनतेकडून मालमत्ता कर वसुली करणे सुरूच आहे. या निवेदना द्वारे नगर परिषद अध्यक्ष यांना अशी विनंती आहे की जनतेने आपणाला नगरपरिषदेच्या निवडणूकीत बहुसंख्य मते देऊन आपली निवड केली आहे . नगरपरिषदेत आपल्याच भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि केंद्रातही आपल्या पक्षाची सत्ता असताना या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपणाला लॉक डाऊन च्या काळात जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देता आले असते पण आपणाकडून या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या आहे. जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही.

    आपणास बहुमतांनी निवडून दिलेल्या जनतेचे आर्थिक संकटाच्या संघर्ष काळात त्यांना एक धीर म्हणून नगरपरिषदेच्या आमसभेत सन 2020 21 या वर्षातील मालमत्ता धारकांकडून आकारला जाणारा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव संमत करावा. या सर्व परिस्थितीचा विचार करता नगर परिषद प्रशासनाने 20- 21 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना (शासकीय पगारदार वगळून) मालमत्ता कर पूर्णता माफ करावा .अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांच्या तर्फे करण्यात येत आहे .यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत महेश माकडे, गोरख भगत, राजेंद्र पाटील, जयंत धोटे ,दिनेश वाघ, राजू कुरेकार ,अजय मुळे इत्यादी विदर्भ विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते