कोरोना मृतांच्या कुटुंबांस पेन्शन – भारतीय दलित कोब्रा अॅड.विवेकभाई चव्हाण

53

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.1जून):-कोरोना संसर्गामुळे मृत्यू पडलेल्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच ज्या कुटुंबातील आई वडील हे मृत्युमुखी पडले असतील त्यांच्या पाल्यांना (मुलांना ) यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे आई-वडील गमावलेल्या मुलांना जवळच्या २ किलोमीटर परिसराच्या आतील केंद्रीय विद्यालय मोफत शिक्षणाची सोय केली आहे, तसेच जी मुले खाजगी शाळेत शिक्षण घेतात त्यांची फी पीएम केअर्स फंडातून सरकार भरणार आहे आणि आरोग्य विम्याची रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे.

कोरोना संसर्गामुळे जीव गमावलेल्या कुटुंबीयांन सरकारने अर्थसहाय्य करावे तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी यासाठी १ ते ७ मे असे ७ दिवसांचे भारतीय दलित कोब्राचे प्रमुख कोब्राराजे एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांनी उपोषण केले होते, त्यावेळेस त्यांच्या या मागणीला केंद्राने तत्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तसेच राज्य सरकारनेही आई-वडील किंवा दोघांपैकी एक गमावलेल्या मुलांचा शिक्षण आणि संगोपनाचा खर्च उचलण्याची जबाबदारी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

ज्या कुटुंबातील कर्ता माणूस आई किंवा वडील अथवा दोन्ही कोरोना संसर्गाने मृत्यू पावले असतील त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा व एडवोकेट भाई विवेक चव्हाण यांच्या उपोषणामुळे मिळालेल्या या योजनेचा लाभ घ्यावा व कोणत्याही मुलाने शिक्षणापासून वंचित राहु नये याची दक्षता त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावी असे आव्हान भारतीय दलित कोब्रा तर्फे करण्यात येत आहे.