कापड,भांडी,सराफा व इतर दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी गंगाखेड व्यापारी महासंघाची मागणी

83

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1जून):-कोरोणा विषाणू हा कुठलाही व्यवसाय पाहून प्रसार करीत नाही. जिथे गर्दी जमते तिथे त्याचा प्रसार होतो. मग सध्या भाजीपाला, किराणा याठिकाणी पोलिसांच्या अवाहनानंतरही गर्दी होतच आहे. मात्र ते जीवनावश्यक या नियमाखाली झाकल्या जात आहे. किराणा, दुकानाच्या तुलनेत कापड दुकान, सराफा दुकान, जनरल स्टोअर्स, भांडी दुकान याठिकाणी गर्दी कमीच असते. मग हे व्यवसाय सुरू करन्याची मागणी गंगाखेड येथील व्यापारी करत आहेत.
मागील दोन ते अडीच महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद आहेत.

ज्याप्रमाणे किराणा,भाजीपाला व इतर दुकांना जसे नियम लागू आहेत त्याच प्रमाणे,जनरल, कापड, भांडी,सराफा, सराफा कारागीर यांना देखील सर्व नियमांचे पालन करून आठवड्यातील काही दिवस तरी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी असे निवेदन गंगाखेड चे तहसीलदार स्वरूप कंकाल,पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना देण्यात आले.

या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमाणी,उपाध्यक्षअनिलशेठ यानपल्लेवार,सचिव प्रमोद तमेवार, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे चे सचिन दहिवाल,भांडी असोसिएशनचे चे कृष्णा येरावर,आडत असो.चे बंडू घुले,मनोज नळदकर,रोहित पंडित,प्रदीप पाठक, गोविंद रोडे,आदींच्या सह्या या निवेदनावर आहेत.ज्याप्रमाणें शासनाने मद्य विक्रीला परवानगी दिली. मग बाकीची लहान व्यवसाय का सुरू करता येऊ नये तेही लहान व्यवसायिक शासनाचे सर्व नियम पाळूनच व्यवसाय करतील. एक वेळेस शासनाने संधी देऊन पाहावी