शिक्षक भारती भंडारा जिल्हा संपर्कप्रमुखपदी मा.संजय खेडीकर यांची निवड

47

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.1जून):- शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढा देत असनाऱ्या शिक्षक भारती संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदावर संजय खेडीकर यांची निवड करण्यात आली. संजय खेडीकर शिक्षक भारती संघटनेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत.ते शिक्षक भारतीचे राज्य संयुक्त कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. मा.आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात व राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे व नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे यांचे नेतृत्वात शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात शिक्षक भारतीचे संघटन आहे. ते अधिक मजबूत करण्याकरिता आणि संघटनेत सुसूत्रता आणण्याकरिता संघटनेने भंडारा जिल्ह्यात संपर्कप्रमुख नियुक्त केले आहेत.

जिल्हा संपर्कप्रमुख त्या त्या जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च. माध्यमिक प्राथमिक,जी. प. हायस्कूल, मुख्यध्यापक संघ, आश्रमशाळा, विशेष शाळा, या शिक्षक भारतीच्या युनिटमध्ये समन्वयक म्हणून भूमिका निभावने , जिल्हा आणि नागपूर विभाग यांच्यात दुवा म्हणून काम करणे, त्या त्या जिल्ह्यातील समस्या, प्रश्न, जिल्ह्यात होणारी आंदोलणे, सर्व युनिटमधील संघटन बांधणी सर्व युनिट मध्ये समन्वय साधने आदी बाबींची जबाबदारी संपर्कप्रमुख संजय खेडीकर यांना संघटनेने दिली आहे.

या निवडी बद्दल जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश पिकलमुडे,कार्यवाह विनोद किंदरले, कार्याध्यक्ष उमेश शिंगणजुडे, तुमसर तालुकाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, कार्यवाह विजय लोणारे, महिला आघाडी अध्यक्ष सौ.ललिता ठवकर, कु. हिरा बोन्दरे तथा तुमसर तालुक्यातील सर्व शिलेदारांनी व भंडारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलेले आहे.