रेणुका जाधव यांच्या कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक

22

✒️विषेश प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

वसई विरार(दि.1जून):- वंचित बहुजन आघाडी वसई विरार महानगर पालिकेच्या शहर सचिव रेणुका जाधव यांच्या कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कॊरोना झालेल्या रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बीड तसेच इतर सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात रेणुका जाधव व दिलिशा वाघेला या नेहमी तत्पर असतात. आता त्यांनी शहरातील साफसफाईकडे लक्ष दिले असून अनेक ठिकाणी त्यांनी नालेसफाई करून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नालासोपारा येथील वार्ड क्रमांक ८२ मध्ये पावसाळ्यापूर्वी नाले,गटार तुंबून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी नालासोपारा महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने वार्ड क्रमांक ८२ नालासोपारा पूर्व येथील सर्व नाल्यांची साफसफाई करून गाळ काढला तसेच कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सर्व गटारांवर नवीन झाकण लावून दिले. त्यामुळे पावसाळ्यात आता पाणी तुंबण्याची समस्या होणार नसल्याने स्थानिक नागरिकांनी रेणुका जाधव त्यांचे आभार मानले आहे.