परभणीचे जिजाऊ मंदिर सकल समाजासाठी प्रेरणास्थान ठरणार- आमदार श्र्वेताई महाले

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

परभणी(दि.3जून):- परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना परभणी येथे मराठा समाज बांधवांनी तयार केलेल्या राजमाता जिजाऊ मंदिर येथे भेट देऊन राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व त्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.परभणी जिल्ह्यातील असोला या गावात निर्माण होणारे जिजाऊ मंदिर देशातील सकल समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त केली. जिजाऊ संस्थानचे सचिव प्रा. आर के भालेराव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी आमदार सौ मेघनाताई बोर्डीकर ,श्री सुभाषराव कदम, श्री आनंदराव भरोसे, श्री समीर दुधगावकर, श्री सुभाषराव जावळे, श्री पंजाबराव धनले, श्री सुभाष आंबट, श्री रोडगे, श्री कृष्णा सोळंके, श्री बाळासाहेब जाधव, मराठा सेवा संघाचे सचिव श्री सुधाकर गायकवाड, संस्थानचे विश्वस्त श्री अशोकराव रसाळ, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष श्री गजानन जोगदंड व श्री श्याम गाडेकर उपस्थित होते.