राजकारनाच्या व्यतीरिक्त साहेबाचं चारित्र्य पाहायला गेलं तर अगदी माणसातला देव माणूस असं देखील साहेबाना मानता येईल, आज राजकारण खूप वेगळ होताना पाहायला मिळते, पण राजकारण न करता समाज कारण करणारे एकमेव लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब होते, ऊस तोड मजूर शेतकरी वर्ग, कामगार वर्ग यांना आपलंस पण त्याच्या वागण्यातच दिसून यायचं, पूर्वी साहेब येणार आहेत असं जरी कळलं तरी दूर दूरवरुन लोक साहेबाना पाहण्यासाठी यायचे गर्दी कारायचे, ग्रामीण भागातील अगदी तळागाळातील जनसामान्याचा नेता म्हणून साहेब त्या लोकांची कामं करत असतं आज पाहायला गेलं तर कोणालाही भेटणं एवढं सोपं नाहीये,पण साहेब कधीच कोणाला भेट दिली नाही व त्याचे काम केले नाही असं झाले नसेल, सर्व कामे साहेबांनी करून दिली, माझ्या देव घरात आज साहेबाचा फोटो आहे व रोज मला तो फोटो ऊर्जा व प्रेरणा देतो कधी मन खचून गेले तर साहेबाचे भाषन ऐकून संघर्ष करायची ताकत निर्माण होते माझ्या आयुष्यात साहेबानचे तत्वे अगीक्रत करून साहेबानी दाखवलेल्या वाटेनी चालावे असं वाटते.
सत्य प्रामाणिक पना दया प्रेम ही साहेबानची शिकवण घेऊन जीवन सुखी होतं.आज साहेब आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी त्याच्या शिकवणी ह्या सदैव सोबत आहेत साहेब राजकारण या व्यतिरिक्त गरीब जनतेसाठी ही खूप मोठे देवमाणूस होऊन गेले त्याच्या केलेल्या कार्याचे ऋण कधीच फिटणार नाही. शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार अश्यान साठी साहेब नेहमी मदत करत असतं पण आज असा नेता कोणी उरला नाही साहेब तुम्हाला नेहमी वाटायचं माझ्या गरीब मुलाच्या हातात वही पेन असावा पण साहेब तुमच्या जाण्याने आज आमच्या हातात परत कोयता येऊन ऊस तोडन्याची वेळ आली पोटासाठी वनवन भटकण्याची वेळ आली. तुंम्ही असतांना आम्हा शेतकऱ्यांना कधीच कोणाच्या दारी जावं लागतं नव्हतं.पण आज शेतकरी असंख्य दुःखाचा सामना करून जीवन जगतायेत, देवा तू आमच्यावर अन्याय केलास माझ्या साहेबाना तू आजपर्यंत जर धरती वर ठेवलं असतं तर बीड चे रूप साहेबांनी कधीच बदलून टाकलं असतं ऊसतोड मजूरांचा जिल्हा ही ओळख कधीच मिटली असती.
पण दुर्दैव साहेब तुम्ही आम्हाला अर्ध्यावर सोडून गेलात दुःख वाटतय आज सात वर्ष होतायेत साहेब यात आम्ही होरपळुन निघालोत तुमच्या जाण्याने गरीब शेतकरी शेतमजूर खुप दुःख भोगतोय, पण साहेब तुंम्ही जी आम्हाला संघर्षाची वाट दाखवली आहे त्या वाटेने आम्ही चालू आम्ही गरीबाची शेतकऱ्याची मुलं तुमच्या आदर्शाने शिकवनिने आयुष्यात प्रत्येक संकटाचा सामना करू साहेब तुंम्ही आज ही आमच्यात जिवंत आहात तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत प्रेम भाव श्रद्धा मनी ठेऊन तुमच्या स्मृती सदैव मनात आहेत ज्या आम्हाला ऊर्जा व प्रेरणा देतात.
✒️अंगद दराडे(माजलगाव बीड)मो:-8668682620