गिरोला येथे झालेल्या चक्रीवादळात लाखो रुपयांच्या झालेल्या नुकसानीची प्रहार सेवक यांच्याकडुन पाहणी

24

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.9जून):- तालुक्यातील शेवटच्या टोकेला असलेल्या गिरोला दि.४जून २०२१ रोजी झालेल्या गिरोला शेत शीवारात मागील पाच दिवसापूर्वी चक्रीवादळांसह जोरदार पाऊस आल्याने गिरोला गावातील घरावरील टिना ऊळाले व कवलाचे छप्पर उडाल्याने गावकरी शेतकऱ्यांचे अन्नधान्य व गाय बैलांचा चारा पूर्णतः भिजला त्यामुळे गावकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले.

त्या नुकसानाची पाहाणी प्रहार सेवक शेरखान पठान, प्रहार सेवक अक्षय बोंदूगवार ,राकेश पात्ररे ,मेकशाम दाबेकर,विनोद उमरे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेत त्वरित दखल घेवून प्रहार सेवक यांनी गीरोला गावातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीची पाहणी केली व प्रशासनाने या बाबद त्वरित उपाययोजना करावी यासाठी स्थानिक पटवारी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला गीरोला गावातील शेतकरी यांना प्रशासनातर्फे मदत मिळाली नाही तर तहसीलदार उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्वरित मदत कार्य शेतकऱ्यांना पोहचवू अशी प्रतिक्रिया प्रहार सेवक यांच्या कडे गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.