मानव विकास परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी बळवंत मनवर यांची नियुक्ती

21

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9जून):-मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, मा.अफसरजी शेख यांनी दि,७ जुन२०२१ रोजी मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सामाजीक कार्यात तत्पर्रत कार्यशिल सर्वसामान्यांना न्यायासाठी झटणारे,तरूण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विदर्भ संपादक सुहानी समाचार न्युज चॅनेलचे यांची कामगीरी व कार्याची पावती म्हणुन आज यवतमाळ जिल्हाध्यक्ष या पदाचा धुरा बळवंतभाऊ मनवर यांच्या खांद्यावर सोपविला आहे.

तो मी पुर्णपणे तन,मन,धनाने सर्वसामान्य माणसांना व गोर गरीबांना रितसर कायद्याच्या चौकटीत अधिन राहुनच न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन व न्यायाला वाचा फोडण्याचे काम करील व न्याय मिळवुन देईलच माझ्या हातुन असे कोणतेही वाईट कृत्य घडणार नाही व संघटनेला गालबोट लागेल असे कदापी कृत्य होणार नाहीं .

आज माझ्यावर जो हा विश्वास संपादन केला तो मी पुर्णपणे विश्वासाने करेल व माझ कार्य पार पाडेल,असे मत मनवर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्वाकडून सुभेच्छाचा वर्षाव होत आहे.