लहान मुलांनकरिता लसीची गाईडलाईन जारी

23

✒️खामगाव प्रतिन(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.10जून):-कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी लहान मुलांनकरिता आरोग्यमंत्रालयाचे वतिने लसीकरणाकरिता गाईडलाईन जारी करण्यात आली आहे
दरम्यान यावेळी12 वर्षापासुन पुढे असलेल्या मुलांची प्रक्रुती तपासण्यासाठी सहा मिनीट चालण्याची शिफारस करण्यात आली आहे.अनियंत्रीत अस्थमा असणार यांचे करिता या टेस्टची शिफारस करण्यात आलेली नाही.कोरोनामुळे प्रक्रुती गंभिर असल्यास आँक्सिजन थेरपी तत्काळ सुरु केली जाणे आवश्यक आहे द्रव व ईलेकट्रोलाईट संतुलित राखले जाणे गरजेचे आहे आणि काँर्टिकोस्टेराँईड थेरपी सुरु केली जावी असेही सांगण्यात आले आहे.

लक्षणे नसणार्या किंवा सौम्य कोरोनाकेसेसमध्ये ऊत्तेजक स्टिराँईड धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभिर आजारी कोरोना रुग्णांनाच डाँक्टरांच्या देखरेखेखाली देण्यात याव अस स्पष्ठ करण्यात आले आहे.स्टिराँईड योग्य वेळेवर योग्यप्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावित असे मार्गदर्शकतत्वात सांगण्यात आले आहे.तज्ञांच्यामते स्टिराँईड सर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीत संसर्ग निर्माण होण्याच कारण आहे.

तसेच पाच वर्षाखालील मुलांना मास्क लावु नका आणि सहा ते अकरा वर्षामधील मुलांना आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत अस सांगण्यात आल आहे.दरम्यान यावेळी डाँक्टरांना अत्यंत गरज असेल तत्व कोरोना पाँझिटिव्ह लहान मुलांना सिटी स्कँनसाठी सांगण्यात याव असेही स्पष्ट सांगण्यात आल आहे.गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे लहान मुलांच्या गाईड लाईन मध्ये सांगण्यात आले आहे