कृषी पदवीधर संघटनेच्या चोपडा तालुकाध्यक्ष पदी संदिप पाटील यांची निवड

23

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.11जून):- तादंलवाडी येथील संदीप दोधु पाटील यांची कृषि पदवीधर संघटनेच्या चोपडा तालुका युवक अध्यक्ष पदी निवड झाली आहे.नाशिक पोलीस टाईम्स चे ते चोपडा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.

कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषन महेश कडूस पाटील व अध्यक्षा मंगल कडूस पाटील यांनी संदिप पाटील यांची निवड केली .प्रदेशाध्यक्ष .सुरज खोमणे .विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनिष भदाणे .युवकचे कार्याध्यक्ष राहुल राजपुत व जळगाव जिल्हा युवक कार्य अध्यक्ष फकिरचंद पाटील यांनी निवडीबद्दल कौतुक केले आहे तसेच चोपडा तालुक्यातुन अभिनंदन होत आहे