खसखस लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या- मनसेचे कैलास दरेकर यांची मागणी

23

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.11जून):-मसाले पदार्थ खसखस लागवडीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदार आष्टी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.सध्या बीड जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात खरीपाची पेरणीस सुरुवात झालेली आहे.परंतु या काळात शेतकऱ्यांना महाबीज,निर्मल या नामांकित कंपन्यांचे उडीद,सोयाबीन बीयाणे मिळत नाही आणि मिळाले तर जास्तीचे पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत.

खतांचे भाव सुद्धा स्थिर नाहीत त्यातच बॅंकेने पीककर्ज थकीत असणारे शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले आहेत.त्यातच कोरोना महामारी ने त्रस्त केले आहे,दुधाला भाव नाही,पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत,खाद्यतेलाचे भाव दीडशे पार गेले आहेत,पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.त्यातच पावसाचा लहरीपणामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं ? यामुळे शेतकऱ्यांना खसखस लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.